सर्वात जुना समुद्रकिनारा होता झारखंडमध्ये
सिंहभूममध्ये मिळाले 3.2 अब्ज वर्षे जुन्या समुद्रकिनाऱ्याचे अवशेष
भारतीय, ऑस्ट्रेलियन आणि दक्षिण आफ्रिकन वैज्ञानिकांच्या एका पथकाने मोठा शोध लावला आहे. पृथ्वीवर सर्वात पहिला खंड आजपासून सुमारे 3.2 अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झाला होता असे त्यांनी शोधून काढले आहे. हा निष्कर्ष मागील संशोधनापेक्षा अत्यंत वेगळा आहे, ज्यात खंड 2.5 अब्ज वर्षांपूर्वी निर्माण होऊ लागले होते असे म्हटले गेले होते. जगातील पहिला समुद्र किनारा भारताच्या झारखंड राज्यातील सिंहभूम जिल्ह्यात होता असे वैज्ञानिकांचे मानणे आहे. हे संशोधन नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसमध्ये प्रकाशित झाले आहे.
या संशोधनाचे नेतृत्व ऑस्ट्रेलियाच्या मोनाश विद्यापीठाच्या वैज्ञानिक प्रियदर्शी चौधरी यांनी केले आहे. त्यांनी 1.3 अब्ज वर्षे जुन्या खडकांमध्ये असलेल्या जिरकोन कणांचे अध्ययन केले, या कणांमध्ये नद्या आणि समुद्राच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. यामुळे त्या काळात खंड अस्तित्वात होते असे स्पष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले.
सिंहभूम क्रेटन
सिंहभूम व्रेटन जवळपास 3.3 ते 3.2 अब्ज वर्षांपूर्वी समुद्राच्या वर आला होता. हा बहुधा जगातील सर्वात जुना समुद्रकिनारा आहे. सिंहभूममध्ये 3.2 अब्ज वर्षे जुन्या समुद्रकिनाऱ्यांचे अवशेष मिळाले आहेत, जे बलुआ दगडाच्या रुपात असल्याचे टीमकडून म्हटले गेले.
खंडनिर्मित मॅग्माची भूमिका
प्लेट टेक्टोनिक्समुळे खंड निर्माण झाल्याची सर्वसामान्य धारणा आहे, परंतु पृथ्वीच्या गर्भातून बाहेर पडलेल्या मॅग्नाने खंडांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावली असेल असे या अध्ययनात म्हटले गेले. वैज्ञानिक आर्कियन क्रेटनच्या आग्नेय आणि तळाच्या इतिहासाला एकीकृत करतात, जेणेकरून स्थित खंडीय भूभाग 3.3 अब्ज वर्षांपूर्वी निर्माण होऊ लागले होते हे दाखवून देता येईल.
खंड निर्माण होण्याचा कालखंड
नवे संशोधन खंड निर्माण होण्याची कालमर्यादा सुमारे 700 दशलक्ष वर्षे मागे नेते. हा शोधन पृथ्वीचा विकास आणि त्याच्या वायुमंडळ तसेच महासागरांसोबतचे संबंध जाणून घेण्यास सहाय्यभूत ठरणार आहे. हवामान बदलाच्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर हा शोध आणखी महत्त्वपूर्ण ठरतो. खंडांचे वयोमान सुमारे 2.5 अब्ज वर्षे असल्याचे आतापर्यंत मानले जात होते. परंतु भारत, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या वैज्ञानिकांच्या या नव्या अध्ययनामुळे खंड 3.3 अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झाल्याचे स्पष्ट होते. या संशोधनाच्या मुख्य वैज्ञानिकाने नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसमध्ये प्रकाशित स्वत:च्या निष्कर्षांमध्ये याचे दाखले दिले आहेत.