For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्कॉटलंडमधील ओल्ड मॅन ऑफ स्टॉर

06:36 AM Oct 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
स्कॉटलंडमधील ओल्ड मॅन ऑफ स्टॉर
Advertisement

सुंदर दृश्यांचा खजिनाच जणू

Advertisement

स्कॉटलंडच्या आइल ऑफ स्कायवर वसलेले एक नैसर्गिक सौंदर्य ओल्ड मॅन ऑफ स्टॉर इतिहास आणि रहस्याने भरपूर एक मनमोहक स्थळ आहे. ही प्रतिष्ठित खडकाळ संरचना स्वत:चे उंच शिखर आणि ओबडधोबड स्थितीसोबत दीर्घकाळापासून स्थानिक लोक आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरली आहे. स्कॉटलंडच्या सर्वात प्रसिद्ध स्थळांपैकी एक म्हणून ओल्ड मॅन ऑफ स्टॉर भूवैज्ञानिक महत्त्व आणि स्थानिक लोककथांमध्ये एक खास स्थान बाळगून आहे.

55 मीटरच्या उंचीवर स्थित ओल्ड मॅन ऑफ स्टॉर ट्रॉटर्निश रिजचा हिस्सा आहे. जो एक लोकप्रिय पायी मार्ग असून त्यावर पायी चालण्यास 5-10 दिवसांचा कालावधी लागू शकतो. ओल्ड मॅन ऑफ स्टार नाव स्थानिक असून याचा शाब्दिक अर्थ फ्रेंचमध्ये स्टारचा वृद्ध व्यक्ती असा होतो. स्कॉटिश गेलिमध्ये याला बोडैच एन स्टॉर या नावानेही ओळखले जाते. जेव्हा याला समोरून पाहिले जाते, तेव्हा खडकाळ शिखर आणि त्याच्या मागे द स्टॉर एक थकलेल्या वृद्ध व्यक्तीचा चेहरा दिसत असल्याचा भास निर्माण होतो.

Advertisement

ओल्ड मॅन ऑफ स्टॉर एक प्रमुख खडकाळ शिखर असून जे स्कॉटलंडच्या आइल ऑफ स्कायच्या ट्रॉटर्निशवर उंच उभे आहे. हे प्रतिष्ठित स्थळ एका मोठ्या प्राचीन भूस्खलनाचा परिणाम असून त्याने या प्रभावशाली खडकाळ संरचनांना सोडले आहे, जे शतकांपासून पर्यटकांना आकर्षित करत राहिल आहे. शेकडो शतकांपासून या भूभागाला आकार देणाऱ्या निसर्गाची शक्ती यातून निदर्शनास येते.

निसर्गप्रेमी ओल्ड मॅन ऑफ स्टॉरकडे आकर्षित होतात. याच्या मनोरम दृश्यांमध्ये ओबडधोबड भाग आणि नेहमी बदलणारे हवामान यामुळे आकर्षक वाढते. यामुळे हे ठिकाण छायाचित्रकारांसाठी जणू नंदनवनच ठरते. फोटोग्राफर ओल्ड मॅन ऑफ स्टारच्या अलौकिक आणि नेहमी बदलत्या सौंदर्यासाठी आकर्षित होतात.

ओल्ड मॅन ऑफ स्टॉर लोककथांमध्ये विशेष स्थान बाळगून आहे. या आकर्षक कहाण्या पिढ्यांपासून प्रचलित आहेत. शिखरावर पोहोचल्यावर हायकर्सना आइल ऑफ स्काय आणि त्याच्या आसपासच्या भूभागाचे आकर्षक दृश्य पाहता येते. व्यापक दृश्यात पर्वत, विशाल सरोवर आणि किनारे दिसून येत असल्याने विस्मयकारी अनुभव प्राप्त होतो.

ओल्ड मॅन ऑफ स्टॉरपर्यंत पायी प्रवास करणे आउटडोर उत्साही लोकांसाठी एक रोमांचक आव्हाक सादर करते. उतारचढावयुक्त भाग तसेच सातत्याने बदलणारी हवामानाची स्थिती, प्रवासातील रोमांच आणि उत्साह यामुळे लोकांसाठी एक आकर्षक स्थळ ठरते.

Advertisement
Tags :

.