For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कार्यालय मालकांनीच पार्किंगची सोय करून घ्यावी

10:44 AM Jan 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
कार्यालय मालकांनीच पार्किंगची सोय करून घ्यावी
Advertisement

पार्किंगची सोय न केल्यास कार्यालयांना टाळे ठोकणार : उचगाव ग्रा. पं. बैठकीत निर्णय

Advertisement

वार्ताहर /उचगाव

ग्रामदेवता मळेकरणी देवीच्या दर मंगळवार, शुक्रवारी होणाऱ्या यात्रेवेळी उचगावमध्ये मोठ्याप्रमाणात भाविकांची गर्दी होत असल्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात मळेकरणी देवस्थान कमिटी, मळेकरणी देवीच्या सभोवती असणाऱ्या सर्व कार्यालयांच्या मालकांची व्यापक बैठक ग्रामपंचायत कार्यालयात शनिवार दि. 6 जानेवारी रोजी घेण्यात आली. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करून महत्त्वपूर्ण ठराव करण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ग्रा. पं. अध्यक्षा मथुरा तेरसे होत्या. गावामध्ये शाळेला जाणाऱ्या विधार्थी तसेच बसफेऱ्या करतानासुद्धा या दोन दिवसांमध्ये मोठ्याप्रमाणात गर्दी होत आहे. तसेच यात्रेच्या ठिकाणी पार्किंग व्यवस्था नसल्याने भाविकांना व गावातील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी शनिवारी ही बैठक घेण्यात आली. यावेळी पीडीओ शिवाजी मडिवाळ यांनी प्रास्ताविक करून यात्रेवेळी होणाऱ्या गर्दीबद्दल व पार्किंगबद्दल सविस्तर माहिती दिली. सभोवती असलेल्या कार्यालय मालकांनी आपापले पार्किंग व्यवस्था करावी, याविषयी चर्चा करण्यात आली.

Advertisement

मळेकरणी आमराईमध्ये जेवढे लोक जत्रा करतात. त्या सर्वांचे पार्किंग आम्ही स्वत: आमराईमध्ये करून घेतो. परंतु कार्यालयवाल्यांनी स्वत:ची पार्किंग व्यवस्था करणे गरजेचे आहे. कार्यालयवाल्यांची वाहने आमराईतील पार्किंगमध्ये घेणार नाही, असे सांगण्यात आले. कार्यालयवाल्यांचे पार्किंग नसल्यास ती कार्यालये बंद करण्यात येऊन टाळे ठोकण्यात येईल, अशी सक्त ताकीद मडिवाळ यांनी दिली. तसेच केरकचरा पंचायतीच्या गाडीमध्ये टाकून कार्यालयांची स्वच्छता ठेवावी. त्याचप्रमाणे प्रत्येक कार्यालयामध्ये सीसीटीव्ही लावणे गरजेचे आहे, असे ठराव करण्यात आले. या सर्व ठरावांना मळेकरणी देवस्थान कमिटीच्या सर्व सदस्यांनी तसेच कार्यालयांच्या सर्व मालकांनी एकमुखी पाठिंबा दिला. त्याचप्रमाणे एका कार्यालयामध्ये एकच यात्रा बुकिंग करण्यात यावी, असाही ठराव करण्यात आला. बैठकीला ग्रा. पं. उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे, सदस्य एल. डी. चौगुले, यादो कांबळे, बंटी पावशे, मोनापा पाटील, गजानन नाईक, दत्ता बेनके यासह सर्व सदस्य उपस्थित होते. सेक्रेटरी सुमेरा मोकाशी, मळेकरणी देवस्थान कमिटीचे सदस्य उपस्थित होते.

मद्यपानवरही बंदी

यात्रेवेळी येणाया भाविकांना सक्त ताकीद म्हणून मळेकरणी देवीच्या आमराईच्या आजूबाजूला व कार्यालयामध्ये कोणीही दारू पिताना आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. या यात्रेमध्ये दारूबंदी करण्याचा ठराव एकमुखी करण्यात आला आहे. तसेच यात्रेला येणाऱ्या भाविकांनी आजूबाजूच्या शेतवडीमध्ये दारू पीत असताना आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. किंवा तेथील शेतकरी वर्गाने त्यांच्यावरती मारबडव, कोणताही हल्ला केल्यास याला कोणीही जबाबदार राहणार नाही.

Advertisement
Tags :

.