जर्मनीला 5-3 ने नमवूनही भारतावर शूटआऊटमध्ये मालिका गमावण्याचा प्रसंग
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि सुखजित सिंग यांच्या प्रत्येकी दोन गोलांच्या बळावर भारताने दुसऱ्या हॉकी कसोटी लढतीत विश्वविजेत्या जर्मनीवर 5-3 असा विजय मिळवला. पण यजमानांवर दोन सामन्यांची मालिका शेवटी शूटआऊटमध्ये गमावण्याची पाळी आली. येथील मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये गुऊवारी सुऊवातीला आघाडीवर राहिलेल्या जर्मनीसाठी एलियान माझकूर (7 व्या आणि 57 व्या मिनिटाला) याने दोन गोल केले, तर हेन्रिक मेर्टजेन्स (60 व्या मिनिटाला) याने पाहुण्यांचा दुसरा गोल केला. पण दुसऱ्या सत्रामध्ये सुखजित सिंग (34 व्या आणि 48 व्या मिनिटाला), कर्णधार हरमनप्रीत सिंग (42 व्या आणि 43 व्या मिनिटाला) आणि अभिषेक (45 व्या मिनिटाला) यांच्या गोलमुळे भारताने दोन सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधली.
जर्मनीने बुधवारी पहिली कसोटी 2-0 ने जिंकली होती. पण शूट-आऊटमध्ये भारत 1-3 ने पराभूत झाला. हरमनप्रीत, अभिषेक आणि मोहम्मद राहिल यांचे फटके हुकले, तर आदित्य हा एकमेव गोल करणारा खेळाडू राहिला. भारताचा गोलरक्षक कृष्ण बहादूर पाठक याने दोनदा फटके चांगल्या प्रकारे अडविले, परंतु शूट-आऊटमध्ये तो आपल्या संघाला पराभूत होण्यापासून वाचवू शकला नाही. त्यापूर्वी भारतीयांनी आक्रमक सुऊवात केली आणि संधी निर्माण केल्या, परंतु जर्मन बचावाचा भंग करण्यात त्यांना अपयश आले. जर्मनीनेच सातव्या मिनिटाला एलियान माझकूरच्या माध्यमातून आघाडी घेतली, ज्याने उजव्या कोपऱ्यातून जोरदार रिव्हर्स शॉट हाणला. दोन मिनिटांनंतर नवोदित आदित्य अर्जुन लालगे भारतातर्फे पहिला गोल करण्याच्या जवळ पोहोचला होता, परंतु जर्मनप्रीत सिंगच्या पासवरील त्याचा फटका जर्मन गोलरक्षकाने अडविला. वाचवला.
भारताला अनेक पेनल्टी कॉर्नर मिळाले, परंतु त्यांचे गोलमध्ये त्यांना रुपांतर करता आले नाही. तिसऱ्या सत्रात तर चार मिनिटांत तीन लागोपाठ पेनल्टी कॉर्नर त्यांना मिळाले, परंतु सर्व वाया गेले. हरमनप्रीतने एका मिनिटाच्या अंतराने लागोपाठ दोन गोल करून अखेर ही कोंडी फोडली. त्याने प्रथम जर्मन गोलच्या उजव्या कोपऱ्यात चेंडू फटकावला आणि एका मिनिटानंतर शक्तिशाली ग्राऊंड फ्लिक हाणला. त्यानंतर अभिषेकने उजव्या कोपऱ्यातून जोरदार फटका हाणून संघाला 4-1 अशी आघाडी मिळवून दिली. चौथ्या आणि शेवटच्या सत्रात सुखजितने डायव्हिंग रिव्हर्स हिटच्या जोरावर ही आघाडी वाढविली. पण लढाऊ जर्मन खेळाडूंनी हार मानली नाही आणि अंतिम शिटी वाजण्यास तीन मिनिटे असताना ‘डी’ क्षेत्राच्या आत मिळालेला चेंडू माझकूरने गोलमध्ये हाणला. त्यानंतर अंतिम शिटी वाजण्याच्या वेळी मेर्टजेन्सने आणखी एक गोल नोंदविला. दोन्ही बाजूंनी प्रत्येकी एक सामना जिंकला गेल्याने शेवटी मालिकेचा विजेता शूटआऊटद्वारे ठरविला गेला.