महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘त्या’ जहाजावरील हल्ला इराणी ड्रोनमधून

06:33 AM Dec 25, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अमेरिकेचा दावा : मात्र, इराणने आरोप फेटाळल्याने संदिग्धता

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

हिंदी महासागरात भारताकडे येणाऱ्या मालवाहू जहाजावर शनिवारी केलेला इल्ला इराणच्या ड्रोनमधून करण्यात आल्याचा दावा अमेरिकेच्या संरक्षण विभागाने केला आहे. अमेरिकन सूत्रांच्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी 10 वाजता केम प्लूटो नावाच्या जहाजावर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यादरम्यान हे जहाज अमेरिकेच्या संपर्कात होते. मात्र, जहाजावरील हल्ल्याबाबत अमेरिकेचे आरोप इराणने फेटाळून लावल्यामुळे एकूणच ह्या प्रकाराबाबत संदिग्धतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

सौदी अरेबियातून तेल घेऊन भारतात येणारे हे जहाज जपानचे असून ते लायबेरियाच्या झेंड्याखाली कार्यरत होते. हल्ल्याच्या वेळी जहाज पोरबंदर किनाऱ्यापासून 217 नॉटिकल मैल (सुमारे 400 किमी) अंतरावर होते. हे क्षेत्र भारताच्या विशेष आर्थिक क्षेत्राच्या बाहेर येते. या हल्ल्यावेळी विमानात 25 भारतीय क्रू मेंबर्सही होते. सर्वजण सुरक्षित असल्याचे भारतीय नौदलाने म्हटले आहे.

जहाजावर झालेल्या हल्ल्याची माहिती मिळताच अमेरिकेने यूएसएस लॅबून ही युद्धनौका घटनास्थळी पाठवली होती. या काळात हुथी बंडखोरांनी नॉर्वेजियन तेल टँकरवरही हल्ला केला. मात्र, त्यांचे लक्ष्य चुकले. हुथी बंडखोरांनी गेल्या 70 दिवसांत 15 जहाजांवर हल्ले केल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले होते.

अमेरिकेचे आरोप इराणने फेटाळले

इराणने अमेरिकेचे आरोप फेटाळून लावले आहेत. हुथी बंडखोरांकडे स्वत:ची शस्त्रे आहेत, ते स्वत:चे निर्णय घेतात. यात आमची भूमिका नाही. हुथी बंडखोर लाल समुद्र आणि आसपासच्या भागात वारंवार जहाजांवर हल्ले करतात. अशा परिस्थितीत त्यांनीच या जहाजावर हल्ला केल्याचा संशय अधिक असल्याचे इराणचे उप परराष्ट्रमंत्री अली बगेरी म्हणाले.

इस्रायल-हमास युद्ध सुरू झाल्यानंतर हुथी बंडखोर लाल समुद्र आणि त्याच्या आसपासच्या भागात जहाजांवर सातत्याने हल्ले करत आहेत. जोपर्यंत इस्रायल गाझामधील हल्ले थांबवत नाही तोपर्यंत ते इस्रायल किंवा त्याच्या सहयोगी जहाजांवर हल्ले करत राहतील, असे हुथी बंडखोरांचे म्हणणे आहे. शनिवारी भारतात येणारे जहाजही इस्रायलचे असल्याचे यापूर्वी सांगण्यात आले होते. हमाससोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान हिंदी महासागरात इस्रायली जहाजाला लक्ष्य करण्यात आले आहे. सागरी एजन्सीने लायबेरियन ध्वजांकित जहाज इस्रायली असल्याचे वृत्त दिले आहे. सध्या अधिकारी या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. तसेच भारतीय तटरक्षक जहाज आयसीजीएस विक्रम अरबी समुद्रात हल्ला झालेल्या व्यापारी जहाजाच्या दिशेने निघाले आहे. भारतीय जहाजाने मदत पुरवण्यासाठी धाव घेताना परिसरातील सर्व जहाजांना सतर्क केले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat#social media#tarunbharatnews
Next Article