महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बिहारमध्ये गरीब कुटुंबांना मिळणार 2 लाख; नितीश कुमार सरकारचा मोठा निर्णय

06:48 AM Jan 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जातनिहाय सर्वेक्षण अहवालाचा आधार : 

Advertisement

वृत्तसंस्था/ पाटणा

Advertisement

बिहारमधील नितीश कुमार सरकारने मंगळवारी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. जातनिहाय सर्वेक्षणाच्या अंतर्गत राज्यातील 94 लाख गरीब कुटुंबांची ओळख पटविण्यात आली होती. आता या गरीब कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये दिली जाणार आहे. याकरता संबंधित गरीब कुटुंबांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.

राज्यात मागील वर्षी पार पडलेल्या जातनिहाय सर्वेक्षणाच्या आधारावर 94 लाख 33 हजार 312 गरीब कुटुंबांची ओळख पटविण्यात आली आहे. मासिक उत्पन्न 6 हजार रुपयांपेक्षा कमी असणारी ही कुटुंब आहेत. या कुटुंबांतील किमान एका सदस्याला पुढील 5 वर्षांमध्ये रोजगारासाठी दोन लाख रुपयांची अनुदान रक्कम उपलब्ध करण्याचे राज्य सरकारचे लक्ष्य आहे. 2023-24 साठी 250 कोटी तर 2024-25 साठी सांकेतिक स्वरुपात एक हजार कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे.

गरीब कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये देण्याचा नितीश कुमार सरकारचा हा निर्णय गेमचेंजर ठरू शकतो. आगामी लोकसभा निवडणूक पाहता हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. बिहारमधील गरीब कुटुंबांमध्ये सर्व जाती आणि धर्माचे लोक असल्याचे मानले जाते. या गरीब कुटुंबांना थेट आर्थिक मदत करत नितीश कुमार हे लोकसभा निवडणुकीत मोठ्या पाठिंब्याची अपेक्षा करत असल्याचे मानले जात आहे.

तर रस्ते दुर्घटनेत मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. रस्ते दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्याच्या कुटुंबीयांना आता 5 लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे. यापूर्वी ही रक्कम 4 लाख इतकी होती. तसेच सीएम प्रोत्साहन निधीतही वाढ करण्यात आली आहे. याचबरोबर सीएम चिकित्सा सहाय्य योजनेच्या अंतर्गत किडनीच्या उपचारासाठी 2.5 लाख रुपये दिले जाणार आहेत.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article