महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

दुसऱ्या दिवशीही हलगाजवळ कंटेनर उलटला

11:47 AM Jul 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सुदैवानेच जीवितहानी टळली 

Advertisement

बेळगाव : पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या हलगा गावाजवळील सर्व्हिस रस्त्यावर दुसऱ्या दिवशीही कंटेनर पलटी झाल्याची घटना सोमवारी रात्री 10 च्या सुमाराला घडली आहे. रविवारी एक ट्रक पलटी झाला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा ही घटना घडली आहे. सध्या पावसाळा सुरू असून सर्व्हिस रस्त्याच्या बाजूला वाहने घेतल्यानंतर अचानक वाहने घसरून पलटी होत आहेत. तर काही चालकांच्या बेजबाबदारपणामुळे या घटना घडू लागल्या आहेत. सोमवारी रात्री ही घटना घडली. सुदैवानेच या घटनेमध्ये जीवितहानी टळली आहे. रात्री घटना घडली तरी मंगळवारी दिवसभर हा कंटेनर रस्त्याच्या बाजूला तसाच पडून होता.

Advertisement

हलगा ते बस्तवाड परिसरात अपघातांच्या घटना अधिक

हलगा, बस्तवाड ही गावे राष्ट्रीय महामार्गाला लागून आहेत. या रस्त्यावरून नेहमीच वाहनांची वर्दळ असते. याचवेळी या दोन्ही गावांतील वाहनधारक, दुचाकीस्वार व सायकलस्वार ये-जा करत असतात. त्यावेळी या मोठ्या वाहनांची धडक बसून अपघाताच्या घटना घडत आहेत. तेव्हा या परिसरात रहदारी पोलीस तैनात करून भरधाव वाहने चालविणाऱ्या चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article