कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नव्या आरटीओ कार्यालयामुळे मिळणार उत्तम सुविधा

12:14 PM Jul 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मंत्री रामलिंगा रेड्डी यांचा विश्वास : प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे थाटात उद्घाटन

Advertisement

बेळगाव : बेळगावमध्ये नव्या आरटीओ कार्यालयामुळे नागरिकांना अधिकाधिक उत्तम सेवा दिल्या जाणार आहेत. कोट्यावधी रुपये खर्च करून एकाच ठिकाणी आरटीओच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा पुरविण्याची जबाबदारी आता अधिकाऱ्यांवर असेल, असे प्रतिपादन परिवहनमंत्री रामलिंगा रेड्डी यांनी केले. संगोळ्ळी रायण्णा चौक येथील बेळगाव विभाग संयुक्त परिवहन आयुक्त कार्यालय आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याणमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार असिफ सेठ, बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, हमी योजना समितीचे अध्यक्ष विनय नावलगट्टी, रस्ते सुरक्षा आयुक्त योगेश ए. एम., पोलीस आयुक्त भूषण बोरसे, जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांच्यासह इतर उपस्थित होते.

Advertisement

पुढे ते म्हणाले, बैलहोंगल येथे पाच कोटी खर्चून स्वयंचलित ड्रायव्हिंग मार्गाचे उद्घाटन करण्यात आले आहे. विशेषत: उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमध्ये कर्णकर्कश आवाजातील गाणी लावली जातात. अशा ट्रॅक्टरचालकांवर कारवाई केली जाईल. परिवहन विभागाच्या कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यासोबत जिल्ह्यात इलेक्ट्रिक बसेस पुरविल्या जातील, असे त्यांनी सांगितले. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी शाळा-महाविद्यालय विद्यार्थ्यांना बस अपुऱ्या पडत असल्याची तक्रार परिवहन मंडळासमोर मांडली. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी शक्ती योजना लागू केल्याबद्दल सरकारचे कौतुक करत आरटीओ कार्यालयातील एजंटराज दूर करण्याची मागणी केली. बेळगाव विभागाच्या परिवहन सहआयुक्त एम. पी. ओंमकारेश्वरी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रादेशिक वाहतूक अधिकारी (आरटीओ) नागेश मुंडास यांनी आभार मानले. यावेळी निवृत्त आरटीओ शिवानंद मगदूम, कॉन्ट्रॅक्टर उदयकुमार शेट्टी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्याला मिळणार 300 बसेस

बेळगाव जिल्हा हा राज्यातील सर्वात मोठा जिल्हा असल्याने काही ठिकाणी बसची कमतरता भासत आहे. यासाठी बेळगाव जिल्ह्यासाठी 300 नव्या बस पुरविल्या जाणार आहेत. यापैकी शंभर बस या इलेक्ट्रिक असणार आहेत. काही चिकोडी तर काही बेळगावला बस दिल्या जाणार असल्याने जिल्ह्यातील नागरिकांना ये-जा करणे सोयीचे होईल, असे आश्वासन परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी दिले.

आरटीओ कार्यालयातील एजंटराज संपवा...

बेळगाव आरटीओ कार्यालयात नागरिकांऐवजी एजंटांचीच कामे लवकर केली जातात, असा आरोप महिला व बालकल्याणमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केला. यावर बोलताना परिवहनमंत्री म्हणाले, एजंटांमुळे नागरिकांना नाहक त्रास दिला जात आहे. यापूर्वी परिवहन आयुक्तांनी एक आदेश बजावला असून एजंटांना कार्यालयात प्रवेश दिला जाऊ नये, अशी सूचना करण्यात आली आहे. बेळगाव आरटीओ कार्यालयातील एजंटराज संपवून जलद सेवा द्याव्यात, अशी सूचना परिवहनमंत्र्यांनी केली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article