कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

9 मे रोजी प्रदर्शित होणार ’द नेटवर्कर’

06:49 AM May 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

एमएलएमच्या फसवणुकीच्या जाळ्याचे सत्य दाखविणार

Advertisement

‘द नेटवर्कर’ या चित्रपटाचा ट्रेलर सादर करण्यात आला आहे. हा चित्रपट मल्टी-लेव्हल मार्केटिंग (एमएलएम)च्या जगतातील होणारी फसवणूक दाखविणारा आहे. गुटरगूं एंटरटेन्मेंट आणि नवऋतू फिल्म्सकडून निर्मित ‘द नेटवर्कर’ चित्रपट कशाप्रकारे लोक नेटवर्क मार्केटिंगच्या आकर्षक स्वप्नांमध्ये फसून स्वत:च्या जीवनाचे महत्त्व गमावून बसतात हे दाखविणार आहे. कहाणी आणि अभिनय संवेदनशील असल्याने चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करणारा असल्याचे बोलले जात आहे.

Advertisement

आम्ही हा चित्रपट छोट्या बजेटमध्ये तयार केला असला तरी याचा प्रभाव खरा आहे. लोक हा चित्रपट पाहण्यासाठी तयार होत असल्याचे पाहून आनंद होतो, असे उद्गार चित्रपटातील मुख्य अभिनेता विक्रम कोचरने काढले आहेत.

हा एक सशक्त आणि प्रभावशाली चित्रपट असून यात बेरोजगारी, जीवनातील सत्यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. याचा ट्रेलर अत्यंत दमदार असून गाणी प्रभावी आहेत, असे अभिनेता दुर्गेश कुमारने म्हटले आहे.

‘द नेटवर्कर’चे दिग्दर्शन विकास कुमार विश्वकर्मा यांनी केले आहे. तर याची निर्मिती विकास मलिक आणि शरद मलिक यांनी केली आहे. चित्रपटात विक्रम कोचर, विंध्य तिवारी, अतुल श्रीवास्तव, वेदिका भंडारी, बृजेंद्र काला, दुर्गेश कुमार, इश्तियाक खान, निकहत खान, भाविनी गोस्वामी आणि ऋषभ पाठक हे कलाकार दिसून येणार आहेत. हा चित्रपट 9 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article