महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

खऱ्या इतिहासातून तरूणांमध्ये देशप्रेम निर्माण करण्याची गरज

01:04 PM Dec 27, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन : पर्वरी येथे ‘वीर बालक दिवस’ साजरा

Advertisement

पर्वरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षीपासून शिखांचे दहावे गुऊ गोविंद सिंग यांच्या पुत्रांच्या शौर्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि आजच्या तऊणांना प्रेरणा देण्यासाठी 26 डिसेंबर हा दिवस ‘वीर बालक दिवस’ म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. आजच्या तऊणांमध्ये विकसित भारत निर्माण करण्याची ताकद आहे. त्यासाठी त्यांच्यासमोर देशाचा खरा इतिहास आणून त्यांच्यात देशप्रेम निर्माण करणे ही काळाची गरज आहे, असे उद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले. पर्वरी येथील राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या सभागृहात शिक्षण संचालनालयाने आयोजित  केलेल्या ‘वीर बालक दिवस’ कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानवडे, शिक्षण संचालक शैलेश झिंगडे उपस्थित होते.

Advertisement

इतिहासात तरुणांचे मोठे योगदान

भारताच्या इतिहासात डोकावून पाहिले तर देशाच्या जडणघडणीमध्ये तऊणांचे  खूप मोठे योगदान आहे. छत्रपती शिवाजी महाराज, भगतसिंग, विवेकानंद, संत ज्ञानेश्वर यांनी ऐन ताऊण्यात देशासाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या शौर्याच्या गाथा, त्यांनी दाखविलेले धारिष्ट्या आजच्या तऊणांसमोर आणले पाहिजे.

 खरा इतिहास शिकवला पाहिजे : देसाई

आजचा तऊण हा देशाचा भावी आधारस्तंभ आहे. त्यासाठी आज शाळांमध्ये खरा इतिहास शिकविला गेला पाहिजे. आजच्या पिढीची इतिहासपासून जी नाळ तोडली गेली आहे. ती पुन्हा जोडण्याची गरज आहे. इतिहासपासून बोध घेऊन चुका सुधारून पुढे जाणे आवश्यक आहे. तेव्हाच संस्कारक्षम पिढी तयार होईल, असे समग्र शिक्ष अभियानचे समन्वयक गजानन देसाई म्हणाले. यावेळी विद्या प्रबोधिनी, सरकारी हायस्कूल आणि डॉ. के. ब. हेगडेवार हायस्कूलची मुले उपस्थित होती. शैलेश झिंगडे यांनी स्वागत केले, सहायक संचालक सिंधू प्रभुदेसाई यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. शंभू घाडी यांनी आभार मानले.

 गुरुद्वारात घेतले दर्शन

दरम्यान, वीर बाल दिवसाचा मुहुर्त साधून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक तसेच पर्यटनमंत्री रोहन खंवटे, भाजप गोवा प्रदेशाध्यक्ष व राज्यसभा खासदार सदानंद तानावडे आणि इतरांनी बेती-बार्देश येथील गुऊद्वारास भेट दिली. सर्वजण तेथील प्रार्थनेत, भजनात ते सहभागी झाले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article