महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नौदलाने बदलले एपॉलेट्सचे डिझाइन

06:46 AM Dec 30, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पंतप्रधान मोदींनी केली होती घोषणा : एपॉलेट्सचे नवे डिझाइन नौदलाच्या ध्वजावर आधारित

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भारतीय नौदलाच्या अॅडमिरलच्या खांद्यांवर लावण्यात येणारे पदसूचक चिन्ह (एपोलेट्स)च्या डिझाइनमध्ये बदल करण्यात आला आहे. नवे डिझाइन हे छत्रपर्तीं शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेने प्रेरित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नौदल दिन 2023 दरम्यान याची घोषणा केली हाती.

एपालेट्सचे नवे डिझाइन नौदलाच्या ध्वजावर आधारित आहे. हे आमच्या समृद्ध सागरी वारशाचे खरे प्रतिबिंब आहे. नवे डिझाइन आमचे पंच प्रणाचे दोन स्तंक्ष वारशाबद्दल गर्व आणि गुलामीच्या मानसिकतेपासून मुक्तीसंबंधीचे आमचे समर्पण दर्शवित असल्याचे नौदलाने म्हटले आहे.

भारतीय नौदलाने स्वत:च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी नवे एपॉलेट्स सादर केले आहेत. यांचा वापर गणवेशावर केला जाणार आहे. एपॉलेट्स नौदलाच्या अधिकाऱ्यांद्वारे परिधान करण्यात येणाऱ्या गणवेशाच्या खांद्यावर लावण्यात येणारे एकप्रकारचे पदसूचक चिन्ह असते. नौदलाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेकडून प्रेरणा घेत एपॉलेट्सचे नवे डिझाइन सादर केले आहे.

एपोलेट्सच्या नव्या डिझाइनमधील चिन्हांचा अर्थ

गोल्डन नेव्ही बटन : एपोलेट्समध्ये असलेले गोल्डन नेव्ही बटन गुलामीची मानसिकता दूर करण्यासाठी भारतीय नौदलाचे समर्पण दर्शविणारे आहे.

अष्टकोण : हे आठ प्रमुख दिशांचे प्रतिनिधित्व करते जे एक सर्वांगीण दीर्घकालीन दृष्टीकोन दर्शविणारे आहे.

दुर्बीण : हे नौदलाचे दीर्घकालीन व्हिजन, दूरदर्शीपणा आणि बदलत्या जगावर सातत्याने नजर ठेवण्याची क्षमता दर्शवित आहे.

तलवार : हे राष्ट्रीय शक्ती अग्रणी होणे आणि दबदब्यासोबत युद्ध जिंकणे, विरोधकांना हरविणे आणि प्रत्येक आव्हानावर मात करण्याची क्षमता दर्शविते.

पंतप्रधान मोदींकडून घोषणा

4 डिसेंबर रोजी नौदलाच्या दिनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे आयोजित झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी भारतीय नौदलाच्या रँकमध्ये मोठ्या बदलाची घोषणा केली होती. भारत गुलामीची मानसिकता सोडून पुढे जात आहे. नौदलाच्या अधिकाऱ्यांकडून यापूर्वी परिधान करण्यात येणारे एपोलेट्स यापुढील काळात भारतीय संस्कृती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा दर्शविणारे असतील असे मोदींनी म्हटले होते.

वरिष्ठ अधिकाऱ्यांकरता अंमलबजावणी

नौदलाच्या रँकमधील बदलाचा प्रभावर ऑफिसर रॅकच्याखाली नौदल कर्मचाऱ्यांवरही पडणर आहे. तर एपोलेट्समधील बदल अॅडमिरल स्तरीय अधिकाऱ्यांवर प्रभाव पाडणार आहे. यात रियर अॅडमिरल, व्हाइस अॅडमिरल आणि अॅडमिरल यांचा समावेश आहे. आतापर्यंत नाविकांच्या एपोलेट्समध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. नौदलाने इंग्रजांकडून वारशाच्या स्वरुपात प्राप्त नाविकांच्या रँकची देखील समीक्षा केली आहे. नौदल वसाहतकालीन सैन्य परंपरा संपुष्टात आणण्याच्या मोठ्या मोहिमेवर काम करत आहे. याच्या एका हिस्स्याच्या स्वरुपात नाविकांच्या रँकला भारतीय नावांनी बदलले जाणार आहे. अशाप्रकारे 65 हजारांहून अधिक नाविकांना नवी रँक मिळणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article