गावाचे नावच ‘दिपावली’
आंध्रप्रदेशच्या श्रीकाकुलम जिल्ह्यातील गार तालुक्यात ‘दीपावली’ नावाचे एक गाव आहे. या गावाचे नाव ऐकताच अन्य गावांचे लोक तेथे दर दिनी दिपावलीसारखे वातावरण राहत असेल असे मानू लागतात. परंतु या गावाचे नाव दिपावली कसे झाले यामागे एक कहाणी आहे. उत्तर आंध्रप्रदेशात संक्रांतिचा पर्व मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु याच उत्तर आंध्रमधील श्रीकाकुलम जिल्ह्याच्या दीपावली गावातील लोक दीपावलीचा सण 5 दिवसांपर्यंत साजरा करतात. दीपावलीच्या दिनी पूर्वजांची पूजा केल्यावरच तेथे सण साजरा केला जातो, असे स्थानिक लोक सांगतात.
पूर्वजांचे विशेष पूजन
श्रीकाकुलम जिल्ह्यातील या दीपावली गावात सोंडी समुदायाचे लोक दीपावलीच्या दिनी सकाळी उठून स्थानाधिकार पूजा आणि पितृकर्म करतात. सोंडी समुदायाचे लोक दिपावलीच्या दिनी स्वत:च्या पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पितृ पूजन करतात आणि नवे कपडे परिधान करतात. या गावात संक्रातीप्रमाणेच दिपावलीत देखील नव्या जावयांचा सत्कार केला जातो. हा सोहळा त्यांच्यासाठी खास असतो.