महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रुपाली नाईक यांच्यामुळे मतदारसंघाचे नाव बदनाम

10:24 AM Nov 22, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कारवारचे माजी मंत्री आनंद असनोटीकर यांची पत्रकार परिषदेत जहरी टीका : लोकसभेसाठीही इच्छुक

Advertisement

कारवार : कारवार-अंकोलाच्या माजी आमदार रुपाली एस. नाईक यांना खासदार नव्हे तर जिल्हा पंचायत सदस्य होण्याची योग्यता नाही. त्यांनी आपल्या आमदारकीच्यावेळी मतदारसंघाचे नाव बदनाम केले आहे. अशी जहरी टीका कारवारचे माजी आमदार आणि माजी मंत्री (निजद नेते) आनंद असनोटीकर यांनी केली. असनोटीकर यांनी येथील पत्रकार भवनात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी आगामी लोकसभा निवडणुकीवेळी कारवार मतदारसंघातून भाजपने रुपाली नाईक यांना उमेदवारी दिली तर, तुम्ही नाईक यांना समर्थन देणार का? असा प्रश्न विचारला असता असनोटीकर यांनी वरीलप्रमाणे टीका केली. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी कारवार-अंकोला विधानसभा मतदारसंघात प्रचारसभा घेतली नसती तर रूपाली नाईक यांचा पराभव 20 हजारहून अधिक मताधिक्यांनी झाला असता. मोदी यांच्या प्रचारसभेमुळे 15 हजार मते भाजपच्या पारड्यात टाकण्यात आली.

Advertisement

नाईक यांच्या भ्रष्टाचाराला मतदारसंघातील मतदार वैतागून गेले होते. भ्रष्टाचाराच्या माध्यमातून कमविलेला पैसा मोठ्या प्रमाणात ओतूनही नाईक यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजप नेते नेतृत्वाखालील कर्नाटक सरकारला राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर 40 टक्के कमिशनचा जो काही डाग लावण्यात आला त्याला रुपाली नाईक जबाबदार आहेत. असा आरोपही त्यांनी केला. आता पुन्हा रूपाली नाईक खासदार, आमदार नव्हे तर जिल्हा पंचायत सदस्यही म्हणून निवडून येणे शक्य नाही. कारण त्यांच्याकडे ती योग्यता नाही. भाजप आगामी लोकसभा निवडणुकीच्यावेळी रुपाली नाईक यांना उमेदवारी देणार नाही. पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आलेल्या नाईक यांची वर्णी मंत्रिपदी, महामंडळाच्या अध्यक्षपदी लागणार अशा स्वरूपाच्या बातम्या काही वृत्तपत्राकडून पेरण्यात आल्या होत्या. त्यावेळी आपण नाईक यांची मंत्री किंवा अध्यक्षपदी वर्णी लावण्यात येणार नाही, असा दावा केला होता.

लोकसभा निवडणुकीसाठी आपण इच्छुक

राज्यात भाजप आणि निजदमध्ये मैत्री झाल्याने कारवार जिल्ह्यातील निजदला बळ प्राप्त झाले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्यावेळी आपणही उमेदवारीसाठी इच्छुक असणार असे स्पष्ट करून असनोटीकर पुढे म्हणाले, तथापि विद्यमान खासदार अनंतकुमार हेगडे यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यास आपण उमेदवारीसाठी दावा करणार नाही. ज्येष्ठ खासदार आणि बंधूसमान असलेल्या हेगडे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करून आपण पंतप्रधान मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार. कारण आपण मोदी यांचा कट्टर समर्थक असून त्यांची आज देशाला फार गरज आहे.

आपणाला मराठीही अवगत आहे

आता आपण खासदारकीसाठी इच्छुक आहे. आपणाला मराठीसह कन्नड, हिंदी, कोकणी आणि इंग्रजी भाषेवर बऱ्यापैकी प्रभुत्व आहे. त्यामुळे खासदार होऊन लोकसभेत मतदारवासियांच्या समस्यांना वाचा फोडण्याचे स्वप्न बाळगून आहे. असे त्यांनी पुढे स्पष्ट केले. यावेळी मोहिनी नाईक, संदीप भट, मंगू गौडा आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article