महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘किंचाळणाऱ्या’ ममीच्या रहस्याचा खुलासा

07:00 AM Aug 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पुरातत्वतज्ञांनी इजिप्तच्या लक्सरनजीक मिळालेल्या एका ममीशी निगडित अत्यंत महत्त्वपूर्ण शोध लावला आहे. 1935 मध्ये प्राचीन इजिप्तच्या महिलेचे ममीकृत अवशेष मिळाले होते. यात तिचे तोंड उघडे होते, जे पाहून ती किंचाळत असावी असे वाटत होते. या रहस्यमय महिलेने जवळपास एक शतकापासून संशोधकांनी आकर्षित केले आहे. अलिकडेच वैज्ञानिकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत तिचे जीवन आणि मृत्यूविषयी माहिती शोधून काढली आहे. अत्याधुनिक सीटी स्कॅन, इन्फ्रारेड इमेजिंग आणि अन्य तंत्रज्ञानांचा वापर करत ममीची आकृती विज्ञान, आरोग्य स्थिती आणि संरक्षणासंबंधी माहिती मिळविण्यात आली आहे.

Advertisement

संशोधकांनी स्वत:चे निष्कर्ष फ्रंटियर्स इन मेडिसीन नियतकालिकात प्रकाशित केले आहेत. यानुसार मृत्यूवेळी महिलेचे वय 48 वर्षे होते. तर तिचा मृत्यू 3500 वर्षांपूर्वी झाला होता. परंतु अद्याप असाधारण स्वरुपात तिचे शरीर सुरक्षित आहे. पेल्विस जॉइंटद्वारे तिचे वय निश्चित करण्यास मदत मिळाली.  लोबान आणि जुनिपर राल यासारख्या महागड्या पदार्थांद्वारे तिच्या शरीराला लेपित करण्यात आले होते. या गोष्टी अत्यंत दूरवरून आणल्या गेल्या असाव्यात, यामुळे ही महिला अत्यंत प्रतिष्ठित असावी असे उद्गार कैरो विद्यापीठातील रेडिओलॉजीचे प्राध्यापक आणि अध्ययनाचे लेखक सहर सलीम यांनी काढले.

Advertisement

सलीम यांना तपासणीदरम्यान शरीरावर कुठल्याही प्रकारची चिरफाड दिसून आली नाही. महिलेच्या शरीरातील अवयवांना हटविण्यात आले नव्हते. हा प्रकार समकालीन ममी पद्धतीपेक्षा वेगळा होता. ममीकरणासाठी सर्वसाधारणपणे हृदय वगळता सर्व अंतर्गत अवयव काढून घेतले जात होते. परंतु या शरीरात मेंदू, डायाफ्राम, हृदय, फुफ्फुस, यकृत, आतड्या, किडनी अद्याप आहेत. महिलेच्या जबड्यातील अनेक दात गायब होते, बहुधा मृत्यूपूर्वी तिचे दात तुटले असावेत. परंतु अध्ययनात तिच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नाही. तिच्या शरीरावर महागडे इंपोर्टेड लेप लावण्यात आले होते. ममी चांगल्याप्रकारे संरक्षित होती आणि पारंपरिक धारणांचे खंडन करणारी आहे. केवळ काही प्राचीन इजिप्तच्या ममीच उघड्या तोंडासोबत आढळून आल्या आहेत. सर्वसाधारणपणे ममीचे तेंड बंद करण्यासाठी जबडा आणि कवटीला गुंडाळले जात होते, असे सलीम यांनी सांगितले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article