कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इजिप्तच्या फराहोची शापित थडग्यांच्या रहस्याची उकल

06:47 AM Jul 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

इजिप्तमध्ये अनेक प्राचीन फराहोंची थडगी मिळाली आहेत. यातील काही थडग्यांना शापित मानले जाते. यात सर्वात कमी वयाचा फराहो म्हणजेच इजिप्तचा राजा तूतनखामेनचा मकबरा देखील सामील आहे. अशा थडग्यांनजीक पोहोचताच लोकांचा मृत्यू होतो असे मानले जाते. या थडग्यांना लुटणाऱ्या अनेकांचा रहस्यमय पद्धतीने मृत्यू झाल्याने अशाप्रकारच्या कहाण्या प्रचलित आहेत.

Advertisement

1920 च्या दशकात पुरातत्वतज्ञांनी इजिप्तमध्ये राजा तूतनखामुनच्या मकबऱ्याचे उत्खनन सुरू केल्यावर पुन्हा अशीच घटना घडली होती. उत्खननात सामील मजुरांचा मृत्यू होऊ लागला. या विचित्र मृत्यूंसाठी फराओच्या अभिशापाला जबाबदार ठरविण्यात आले. मग दशकांनी 1970 मध्ये वैज्ञानिकांच्या एका समुहाने कासिमिर चतुर्थच्या मकबऱ्यात प्रवेश केल्यावर 12 सदस्यीय टीमपैकी 10 जण काही आठवड्यातच मृत्युमुखी पडले होते.

Advertisement

आता या शापित थडग्यांचे रहस्य आणि तेथे गेलेल्या लोकांच्या मृत्यूचे कारण समोर आले आहे. प्राचीन फराहोंच्या थडग्यांमधून वैज्ञानिकांना एस्परगिलस फ्लेवस नावाचे कवक मिळाले आहे. हे फुफ्फुसांमध्ये संक्रमण निर्माण करते आणि त्यामुळे लोकांचा मृत्यू होतो. इतक्या जुन्या थडग्यांमध्ये कवकही आढळून येते हे त्यावेळी लोकांना माहित नव्हते. याचमुळे थडग्याचे उत्खनन करणाऱ्या लोकांचा मृत्यू व्हायचा आणि याला इजिप्तच्या सम्राटाचा शाप मानले जात होते.

कवकांमध्ये कॅन्सरशी लढण्याची क्षमता

पेन्सिल्वेनिया विद्यापीठाच्या संशोधकांनी या सुक्ष्मजीवांवर संशोधन करत लोकांचा जीव घेणारा हा जीव जैवचिकित्सेत जीवनरक्षक ठरू शकतो हे शोधले आहे. या कवकांमध्ये ल्यूकेमियाशी लढण्याची क्षमता आहे. हे नवे अध्ययन नेचर केमिकल बायोलॉजी नियतकालिकात प्रकाशित झाले आहे. यातून एस्परगिलस फ्लेवस कॅन्सरशी लढणाऱ्या एजंटमध्ये परावर्तित होऊ शकतो असे कळले आहे. जे एफडीएकडून अनुमोदित पारंपारिक औषधांशी प्रतिस्पर्धा करू शकते.

अद्भूत क्षमतेचा शोध

ऐतिहासिक स्वरुपात विषारी पदार्थाला एका क्रांतिकारक औषधाच्या स्वरुपात स्थापित करण्याच्या क्षमतेवर हे अध्ययन प्रकाश टाकते. रासायनिक आणि जैवआण्विक इंजिनियरिंग तसेच जैव-इंजिनियरिंगच्या सहाय्यक प्राध्यापिका शेरी गाओs यांनी जगातील पहिल्या यशस्वी अँटीबायोटिकचा उल्लेख करत कवकाने आम्हाला पेनिसिलिन दिले असल्याचे म्हटले आहे. नैसर्गिक उत्पादनांनी निर्मित आणखी अनेक औषधे अद्याप शोधली जायची आहेत असेही त्यांनी नमूद पेले आहे.

औषधनिर्मितीत अनेक आव्हान

तर संशोधनाचे लेखक कियुयु नी यांनी याला अत्याधिनक शक्यतांचे अज्ञात क्षेत्र संबोधिले आहे. गाओच्या समुहाने एस्परगिलस फ्लेवसमधून 4 आरआयपीपीएसना पृथक अन् शुद्ध केले, या अणुंनी ल्यूकेमिया पेशींच्या विरोधत मारक परिणाम दर्शविले. परंतु मोठ्या यशासाठी अडथळे देखील आहेत, या रसायनांना शुद्ध करणे कठिण आहे, कारण वैज्ञानिकांनी बॅक्टेरियामध्ये हजारो आरआयपीपीजची ओळख पटविली आहे. कवकांमध्ये अत्यंत कमी आरआयपीपीजीज आढळून आले असल्याचे नी यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article