महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भोस्ते घाटात आढळलेल्या मृतदेहाचे गूढ वाढले ! स्वप्न पडलेल्या युवकाचा खेडमध्ये वावर

12:59 PM Sep 21, 2024 IST | Abhijeet Khandekar
Bhoste Ghat
Advertisement

इंस्टाग्रामवर फिरतानाचे व्हिडिओही व्हायरल; मृतदेहाची ओळख पटवण्यात अपयश, पोलिसांकडून तपास सुरूच

खेड प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील वळणावरील जंगलमय भागात आढळलेल्या अज्ञात मृतदेहाची अद्यापही ओळख पटलेली नाही. स्वप्न पडलेल्या ‘त्या’ युवकाचा तालुक्यात 4-5 दिवस वावर होता. तसे व्हिडिओही इंस्टाग्रामवर व्हायरल केले आहे. यामुळे मृतदेहाचे गूढ वाढले असून येथील पेलिसांकडून साऱ्या शक्यतांचा पडताळा करण्यात येत आहे. ‘त्या’ युवकाने इंस्टाग्रामवर काही व्हिडिओही शेअर केल्याची बाब समोर आली असून युवकाचा घटनेशी नेमका संबंध काय? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

Advertisement

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील आजगाव येथे वास्तव्यास असलेल्या योगेश आर्या याने स्वप्नात आलेला मृतदेह मदतीची याचना करत असल्याचे येथील पोलीस स्थानक गाठत सांगितल्यानंतर पोलीस निरीक्षक नितीन भोयर तातडीने घटनास्थळी पोहचले. भोस्ते घाटातील जंगलमय भागातील एका झाडाखाली मृतदेह आढळला होता. मृतदेहापासून काही अंतरावर त्याची कवटी व एका बॅगमध्ये कपडेही आढळले होते.

Advertisement

मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या स्थितीत आढळल्याने ओळख पटवणे पोलिसांसमोर आव्हान आहे. त्यातच स्वप्न पडलेल्या योगेश आर्या या युवकाचा येथील रेल्वे स्थानक, वेरळ, भोस्ते घाट येथे 4-5 दिवस वावर होता. एका चहाच्या टपरीवरही नाष्टा करत असताना भोस्ते येथे टॉवरच्या कामासाठी आलो असून मागाहून आणखी कामगार येणार आहेत. त्यासाठी त्याने बिस्किटांचे पुडेही खरेदी केले होते. यामुळे पोलिसांचा तपास आणखी संवेदनशील बनला असून गूढ उकलण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षकांसह पोलिसांचा ताफा ‘स्पॉट’वर
भोस्ते घाटातील जंगलमय भागात आढळलेल्या अज्ञात व्यक्तीची आत्महत्या की घातपात, या बाबतची गुंतागुंत वाढली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनीही शुक्रवारी सायंकाळी मृतदेह आढळलेल्या ‘स्पॉट’ची पाहणी केली. दिमतीला पोलिसांचाही ताफा होता. घटनास्थळी काही धागेदोरे आढळताहेत का, याचा पुन्हा शोध घेत पोलिसांनी संपूर्ण परिसरही पिंजून काढला. या बाबतची नेमकी माहिती उपलब्ध होवू शकली नाही.

Advertisement
Tags :
The mystery of the body found in Bhote Ghat young man
Next Article