महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

करणच्या मृत्यूचे गूढ कायम

07:33 AM Dec 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शवचिकित्सा अहवाल ठेवला राखून : खासगी इस्पितळाचा अहवाल गुप्त

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी, मडगाव

Advertisement

धारगळ येथे सुरु असलेल्या सनबर्न पार्टीत शनिवारी दिल्लीतील युवक करण कश्यप याला मृत्यू आला. त्याची शवचिकित्सा करण्यात आली असली तरी त्याचा अहवाल राखून ठेवला आहे. करणच्या किडणीला इजा पोचल्याचे सांगण्यात आले. त्याच्या ‘व्हिसेरा’ चाचणीचा अहवाल आल्यानंतर नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

शनिवारी 28 रोजी सनबर्न पार्टीत कोसळल्यानंतर करण कश्यप याला त्याच्या मित्रांनी म्हापसा येथील खाजगी इस्पितळात दाखल केले होते. तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. मात्र ही माहिती 12 तासानी पोलिसांनी उघड केली.  ही माहिती लपवून का ठेवण्यात आली? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

खाजगी इस्पितळाचा अहवाला काय?

म्हापशातील खाजगी इस्पितळात त्याची चाचणी केल्यानंतर नेमके काय आढळून आले होते आणि त्या इस्पितळाने त्याला मृत घोषित करण्याचे काय कारण दिले आहे, याबाबतची माहिती समोर आलेली नाही. या माहितीत या मृत्यूचे गूढ उकलण्याची शक्यता आहे.

मद्यपान, नशा केल्याचा संशय

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत करण कश्यप आणि त्याचे मित्र खास सनबर्न महोत्सवासाठीच गोव्यात आले होते. सर्वांनीच भरपूर मद्यपान केले होते.  तसेच ते सनबर्न महोत्सवात सहभागी झाले. त्यानंतर त्यांनी आणखी वेगळया प्रकारची नशा केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नशेचा ओव्हरडोस झाला आणि तो तिथेच कोसळला आणि बेशुध्द झाला. नंतर त्याच्या मित्रानीच त्याला म्हापसा येथील खाजगी इस्पितळात नेले असता त्याला मृत घोषीत केले आणि गोमेकॉत पाठविण्यात आले होते.

आयआयटीचा टॉपर होता करण

करण राजू कश्यप हा आयआयटी-कानपूरचा टॉपर होता अशी माहिती त्याच्या वडिलांनी पोलिसांना दिली आहे. रविवारी त्याचे वडील व बहीण गोव्यात पोचल्यानंतर काल सोमवारी गोमेकॉत शवचिकित्सा करण्यात आली. करण कश्यप हा अभ्यासात हुशार होता. तसेच त्याने कॅलिफोर्निया, बर्कले येथील जागतिक स्तरावर प्रशंसित विद्यापीठातही स्थान मिळविले होते आणि तेथे पुढील शिक्षण घेण्यासाठी तो लवकरच प्रवास करणार होता, अशी माहितीही पोलिसांना देण्यात आली आहे.

सखोल चौकशी करावी : विरियातो

करण राजू कश्यप याच्या मृत्यू प्रकरणाची गोवा पोलिसांनी निपक्षपातीपणे चौकशी करावी अशी मागणी दक्षिण गोव्याचे खा. कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी केली आहे. एका तरूणाचा अशा प्रकारे मृत्यू होणे ही फार गंभीर बाब असून पोलिसांनी कोणत्याच दबावाखाली न येता तपास करून त्यांच्या कुटुंबियांना न्याय द्यावा. आमचा आवाज बंद करण्यासाठी आपल्यासहीत आपचे आमदार व्हेन्झी व्हियेगास व व्रुझ सिल्वा यांच्या विरोधात तक्रारी नोंद करण्यात आला. पण, आता एका युवकाचा बळी गेल्याने सत्य परिस्थिती उजेडात आल्याचे खा. फर्नांडिस यांनी म्हटले आहे.

काँग्रेसचे एल्विस गोम्स यांनी करण कश्यपच्या मृत्यूवर दु:ख व्यक्त केले असून तरूण निष्पापांचे रक्त सांडत आहे. करणच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांवर कारवाई होणे आवश्यक असून गोव्यात आम्ही पर्यटकांचे पुरेसे संरक्षण करण्यास अयशस्वी ठरल्याचे म्हटले आहे.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article