इजिप्तच्या राजाची रहस्यमय मूर्ती
भूकंपामुळे झाले होते नुकसान
आधुनिक इजिप्तच्या लक्सर शहरामध्ये नाइल नदीसमोर विशाल आकाराच्या दोनदगडी मूर्ती आहेत. इजिप्तमधील या प्राचीन मूर्तींना ‘कोलोसी ऑफ मेमनोन’ या नावाने ओळखले जाते. जवळपास 60 फूट उंच या रहस्यमय मूर्ती प्राचीन इजिप्तचे फिरौन (राजा) अमेनहोटेप तृतीय यांच्या आहेत, या मूर्तींना ‘सिंगिंग’ स्टॅच्यू म्हणूनही ओळखले जाते, कारण प्रत्येक सकाळी सूर्यकिरणे या मूर्तीवर पडताच त्यातून संगीतमय ध्वनी बाहेर पडत होता.
या मूर्तींचे ख्रिस्तपूर्व 1200 साली झालेल्या भूकंपामुळे नुकसान झाले आहे. तर ख्रिस्तपूर्व 27 साली झालेल्या आणखी एका भूकंपामुळे या मूर्तींचे पूर्णपणे नुकसान झाले हेते. या मूर्तींमध्ये फिरौन अमेनहोटप तृतीय यांची बसलेल्या स्थितीतील प्रतिमा आहे. त्यांचे हात गुडघ्यावर असून नजर पूर्व दिशेने नदीच्या बाजूने आहे. एकेवेळी या दोन्ही मूर्ती अमेनहोटेपच्या स्मारक मंदिराच्या प्रवेशद्वारावर होत्या. कधीकाळी हे मंदिर भव्य होते, परंतु भूकंपामुळे हानी झाल्याने आता केवळ काही अवशेषच शिल्लक राहिले आहेत. या मूर्तींवरून एक वदंता आहे. ख्रिस्तपूर्व 27 साली भूकंपामुळे या मूर्तींची हानी झाली, यानंतर या मूर्तीच्या हिस्स्यांमधून एक अजब संगीतमय ध्वनी ऐकू येत होता, जो सर्वसाधारणपणे सूर्योदयावेळी यायचा, याचमुळे ग्रीक आणि रोमन पर्यटक यांनी या मूर्तीला ‘मेमनॉन’ नाव दिले होते. सिंगिंग स्टॅच्यूचा सर्वप्रथम लेखी संदर्भ ग्रीक इतिहासकार आणि भूगोलवेत्ता स्ट्रैबोकडून मिळतो. त्याने ख्रिस्तपूर्व 20 साली एका यात्रेदरम्यान ध्वनी ऐकल्याचा दावा केला होता. दुसऱ्या शतकातील युनानी यात्री आणि भूगोलवेत्ता पॉसानियासने याची तुलना ‘वीणेच्या तारे’शी केली होती.