महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भरधाव ट्रकची धडक बसून मोटरसायकलस्वार जागीच ठार

01:08 PM Dec 08, 2023 IST | Abhijeet Khandekar
The motorcyclist was killed
Advertisement

पुलाची शिरोली/वार्ताहर

पुणे– बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रकची मोटरसायकला धडक बसून मोटरसायकल स्वार जागीच ठार झाला. हा अपघात शिये फाटा येथे धनराज हॉटेलसमोर शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास झाला.

Advertisement

या अपघातात मयत झालेल्या व्यक्तीचे नाव सतिश पांडुरंग गावडे ( वय ४७ रा. वारणा कोडोली ता पन्हाळा ) असे असून सतिश हा औद्योगिक वसाहतीमधील मंत्री मेटॅलिक्स कंपनीत कामास होता. तो सकाळी शिये फाटा येथे आपल्या मोटरसायकलने जात असता धनराज हॉटेलसमोर आला . दरम्यान पुणेहून बेंगलोरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने तो जागीच ठार झाला. या अपघातामुळे हायवेवर काही काळ वाहतूकीची कोंडी झाली होती. या अपघाताची नोंद शिरोली एम आयडीसी पोलिसात झाली आहे.

Advertisement

 

Advertisement
Next Article