सर्वात अनोखे झरे
पामुकले हे तुर्कियेच्या डेनिजली प्रांतातील एक गाव असून तेथे जगातील सर्वात अनोखे उष्ण पाण्याचे झरे आढळून येतात. चुनादगडाच्या भिंती आणि कापसाच्या महालाप्रमाणे दिसणाऱ्या झऱ्यांमुळे पामुकलेला ‘कॉटन कॅसल’ म्हटले जाते. हे नाव तुर्की शब्द पामुक म्हणजे कॉटन आणि कले म्हणजे महालद्वारे तयार झाले आहे. आता पामुकलेशी संबंधित एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
पामुकले स्वत:च्या हॉट स्प्रिंग्स, पांडऱ्या टेरेस्टड तलाव आणि पवित्र शहर हिएरापोलिससाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणाला जगभरातील लोक भेट देत असतात. येथील झरे आणि तलावांचा आनंद घेत या ठिकाणच्या सौंदर्यावर पर्यटक मुग्ध होत असतात.
पामुकलेच्या पांढऱ्या दगडांच्या पर्वतांची निर्मिती थर्मल झऱ्यातील खनिजयुक्त पाण्यामुळे होते. यात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. याच्याच खडकांना टॅवर्टीन म्हटले जाते. पामुकलच्या टॅवर्टीन खडकांपासून काही अंतरावरच हिएरापोलिस असून ते एक प्राचीन गीको-रोमन सिटी आहे. याचे नाव ‘हॉली सिटी’ असून याचा शोध ख्रिस्तपूर्व 190 च्या काळात झाली होती असे मानले जाते. तेथे एक भव्य अॅम्पीथिएटर असून तो अत्यंत चांगल्या स्थितीत आहे. तसेच अन्य आकर्षक अवशेषदेखील पहायला मिळतात.