सर्वात अनोखे सरोवर
रहस्यमय लाल रंगाच्या टेकड्यांनी घेरलेले
अमेरिकेचे लेक पॉवेल हे अत्यंत लोकप्रिय ठिकाण असून हे एक मानवनिर्मित्त जलाशय आहे. याला लोक अनेकदा सरोवर असे संबोधितात. हे जलाशय कोलोराडो नदीवर निर्माण करण्यात आले असून ते यूटा आणि अॅरिझोनाच्या सीमेपर्यंत फैलावलेले आहे. याला जगातील सर्वात अनोख्या सरोवरांपैकी एक मानले जाते. स्वत:च्या रहस्यमय लाल रंगाच्या टेकड्या आणि त्यामधून वाहणाऱ्या पाण्याच्या आकर्षक दृश्यांसाठी हे प्रसिद्ध आहे. आता या जलाशयाशी निगडित व्हिडिओ व्हायरल होत आहे.
लेक पॉवेल एक अद्भूत ठिकाण आहे. अविश्वसनीय खोरे आणि नैसर्गिक सौंदर्याच्या दृष्टीकोनातून हे ठिकाण अत्यंत वेगळे आहे. याला जगातील टॉप-स्टँड-अप पॅडलबोर्ड स्थळांपैकी एक मानण्यात येते. लेक पॉवेल सुटी व्यतित करण्यासाठीचे लोकप्रिय स्थळ असून येथे दरवर्षी लाखो पर्यटक येत असतात. येथे ते फिशिंग, डायव्हिंग, बोटिंग आणि हायकिंगचा आनंद घेतात. वसंत ऋतूत जलाशयामध्ये पाण्याची पातळी वाढत असते. यामुळे येथील चहुबाजूचे दृश्य अधिकच मोहून टाकणारे असते.
पॉवेल लेक स्वत:च्या नैसर्गिक सौंदर्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. हे जगातील सर्वाधिक फोटो काढले जाणाऱ्या सरोवरांपैकी एक आहे. तसेच या सरोवराला अनेक चित्रपट आणि टीव्ही शोंमध्ये दाखविण्यात आले आहे. या सरोवराचे सौंदर्य मंत्रमुग्ध करणारे असून येथे लोक मजामस्ती करत असतात. आकर्षक दृश्य आणि रोमांचक वॉटर स्पोर्ट्सचा लोक आनंद घेत असतात. याच्या रहस्यमय खोऱ्यापासून रेनबो ब्रिजपर्यंत येथे बरेच काही पाहण्यासारखे आहे.