महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जगातील सर्वात अनोखे हॉटेल

06:34 AM Oct 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रात्री वास्तव्य करा, सकाळी विका सामग्री

Advertisement

जेव्हा तुम्ही एखाद्या हॉटेलात वास्तव्य करत असाल तेव्हा तेथे तुम्ही झोपत असाल, जेवत असाल आणि फार तर हॉटेलच्या उद्यानात बसून वेळ घालवत असतात. हॉटेलचा उद्देश ग्राहकांना केवळ आराम करणे आणि स्वत:चे सामान सुरक्षित ठेवण्यासाठी जागा देणे आहे. परंतु राहण्यासोबत व्यापाराची संधी देणाऱ्या हॉटेलबद्दल तुम्ही कधी ऐकले आहे का? स्कॉटलंडमध्ये असेच एक अनोखे हॉटेल आहे. जेथे तुम्ही रात्री झोपू शकता आणि दिवसा सामग्रीची विक्री करू शकता. कारण हॉटेलसोबत एक दुकान देखील आहे. यामुळे या हॉटेलची मागणी इतकी अधिक आहे की येथे वास्तव्य करण्यासाठी 2 वर्षांची वेटिंग लाइन आहे.

Advertisement

स्कॉटलंडमधील विगटाउन शहराला स्कॉटलंडचे नॅशनल बुक टाउन म्हटले जाते. येथे एक एअर-बीएनबी हॉटेल असून याचे नाव ओपन बुक आहे. या हॉटेलचे वैशिष्ट्या म्हणजे यात वर हॉटेल आहे, म्हणजेच तेथे वास्तव्यासाठी खोल्या ओत. आणि खाली एक पुस्तकाचे दुकान आहे. हे दुकान या हॉटेलात वास्तव्य करणारा चालवू शकतो. तो या दुकानाचा दुकानदार होत पुस्तके विकू शकतो.

कधी न कधी समुद्रकिनारी स्वत:चे बुक स्टोअर सुरू करण्याची इच्छा राहिलेल्या लोकांसाठी हे हॉटेल खास आहे. हॉटेल अत्यंत लोकप्रिय ठरल्याने याचा वेटिंग पीरियड 2 वर्षांचा झाला आहे. हे एक चॅरिटीद्वारे चालविले जाणारे एअर बीएनबी असून जे ऑगस्ट 2014 मध्ये सुरू झाले होते. विगटाउन फेस्टिव्हन कंपनीने हे हॉटेल सुरू केले होते. आतापर्यंत या हॉटेलमध्ये 450 अतिथींना वास्तव्य केले असून ते हवाई तसेच बीजिंगसह अन्य ठिकाणांहून आले होते.

दुकानात ठेवु शकता स्कीम

येथे वास्तव्य करणारे लोक स्वत:च्या मतानुसार बुक शॉपची थीम बदलू शकतात, पुस्तकांची जागा बदलू शकतात, पुस्तके वाचण्यासाठी येणाऱ्या लोकांशी संवाद साधू शकतात. स्टोअरमध्ये कुठल्याही प्रकारची स्कीम ठेवू शकतात. याचमुळे येथे पुस्तकप्रेमी वास्तव्यासाठी येतात. पुस्तकांची किंमत स्वत:च्या सोयीनुसार बदलता येते. हॉटेलमध्ये जितके दिवस वास्तव्य कराल तितके दिवस दुकान चालविता येते. परंतु पुस्तक विक्रीतून प्राप्त रकमेचा हिस्सा कुणाला जातो याबद्दल माहिती समोर आलेली नाही.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article