सर्वात अनोखे प्राचीन शहर
खोल दरीच्या काठावर वसलेले शहर
बोजौल्स हे दक्षिण फ्रान्स्च्या एवेरॉन डिपार्टमेंटमध्ये एक कम्यून आहे. हे शहर सुमारे एक हजार वर्षांपासून अस्तित्वात आहे. हे शहर अत्यंत खोल आणि रुंद खोऱ्याच्या काठावर वसलेले आहे. या खोऱ्याला ‘ले ट्रो डे बोजौल्स किंवा द हॉल ऑफ बोजौल्स’ या नावाने ओळखले जाते. या शहराच्या चहुबाजूला निसर्गाने सौंदर्याची उधळण केली आहे. याचमुळे याला जगातील सर्वात अनोखे प्राचीन शहर म्हटले जाते. हे शहर पाहून लोक अचंबित होत असतात.
बोजौल्स 400 मीटर रुंद आणि 100 मीटरहून अधिक खोल खोऱ्याच्या काठावर वसलेले आहे. हे खोरे घोड्याच्या नाळेच्या आकारचे असून याची निर्मिती डौर्डोउ नदीच्या वेगवान प्रवाहामुळे झाली होती. हे ठिकाण मैसिफ सेंट्रल क्षेत्राचा हिस्सा असून यात पर्वत आणि पठाराचा देखील समावेश आहे.
बोजौल्स स्वत:चे नैसर्गिक सौंदर्य आणि याच्या चहुबाजूने फैलावलेल्या 300 फूट खोल खोऱ्यासाठी ओळखले जाते. याला अनेकदा याच्या अनोख्या रचनेमुळे अनोखे अणि रम्य शहर संबोधिण्यात येते. मोठ्या संख्येत पर्यटक या शहराला भेट देत असतात. या दरीची खोली आणि त्याच्या काठावर वसलेली घरं पाहून ते अचंबित होत असतात. घर आणि चर्चसोबत प्राचीन वास्तूंचे अवशेष लोकांना मनमोहक वाटतात.
प्राचीन शहर आहे बोजौल्स
1,312 फूट रुंद दरीच्या काठावर वसलेल्या शहरात सुमारे 3 हजार लोक राहतात. बोजौल्स भागाच्या वळणदार आकाराने याला एक नैसर्गिक गडाचे स्वरुप दिले आहे, यामुळे येथे एक संस्कृती विकसित होण्याची संधी निर्माण झाली. या प्राचीन शहराचे मूळ लोहयुगाशी संबंधित असून ते रोमन युगापासून आजपर्यंत अस्तित्वात आहे. खोऱ्यात खाली अद्याप 9 व्या शतकातील किल्ल्याचे अवशेष आहेत. तर सध्याचे सर्वात लोकप्रिय स्थळ 12 व्या शतकातील स्टी फॉस्टे चर्च मध्य खोऱ्यातील टेकडीच्या काठावर आहे. याठिकाणच्या भौगोलिक स्थितीची निर्मिती सुमारे 20 लाख वर्षांपूर्वी सुरू झाली होती असे सांगण्यात येते.