जगातील सर्वात निर्जन बेट
2400 किलोमीटरपर्यंत नाही माणसाचे अस्तित्व
आजच्या काळात जगातील जवळपास सर्व भूभागावर माणूस पोहोचला आहे. छोट्यातील छोट्या बेटावरही मानवी वस्ती निर्माण झाली आहे. परंतु अद्याप अशी अनेक बेटे आहेत जेथे माणूस राहत नाही. असेच एक बेट मानवी पासून सुमारे 2400 किलोमीटर अंतरावर आहे. हे बेट दक्षिण अटलांटिक महासागराच्या दुर्गम जलक्षेत्रात असून त्याला बाउवेट नावाने ओळखले जाते. दक्षिण आफ्रिका आणि अंटार्क्टिटकादरम्यान हे बेट आहे. याला जगातील सर्वात एकाकी बेट असेही ओळखले जाते. हे निर्जन बेट रहस्याने भरलेले आहे. याचा एक अजब आणि भयानक इतिहास राहिला आहे.
हे निर्जन बेट अनेक न उलगडलेल्या रहस्यांसोबत एका भयानक भूतकाळाने व्यापलेले आहे. 1964 मध्ये येथे एका नौकेचा शोध लागला होता, ज्यात कुठलाच व्यक्ती नव्हता. याची ओळख अद्याप अज्ञात आहे. 1979 मध्ये एका अमेरिकन उपग्रहाने बाउवेट आणि प्रिन्स एडवर्ड बेटादरम्यान एक चमकणारी वस्तू पाहिली होती. त्यावेळी अखेर हा प्रकाश कसला होता हे सांगता आले नव्हते. हा प्रकाश दक्षिण आफ्रिकन-इस्रायलच्या गुप्त संयुक्त आण्विक बॉम्बस्फोटामुळे निर्माण झाला होता असे आता मानले जाते. परंतु कुठल्याही देशाने याची कबुली दिली नसल्याने हे केवळ कयास आहेत.
बेटावर ज्वालामुखी
या बेटावर माणूस नसला तरीही प्राणी आहेत. येथे पेंग्विन, ओर्कास आणि हंपबॅक व्हेल आहेत. या बेटाचा ग्लेशियर स्नो पेट्रेल आणि अंटार्क्टिक प्रियन सारख्या पक्षी प्रजातींसाठी नंदनवनच आहे. हे बेट निर्जन असले तरी नापीक नाही. येथील वनस्पतींमध्ये लाइकेन आणि काई सामील आहेत. या बेटाच्या मध्यस्थानी एक निष्क्रीय ज्वालामुखी असून तो बर्फाने भरलेला ख•ा ठरला आहे.
कुठल्या देशाचे नियंत्रण
सागराच्या लाटा आणि प्रतिकूल हवामानामुळे येथे नौका पोहोचणे अवघड ठरते. बेटावर 1955 मध्ये ज्वालामुखी विस्फोट झाला होता. 1930 पासून येथे नॉर्वेचे नियंत्रण आहे. 2006मध्ये येथे 6.3 तीव्रतेचा भूकंप झाला होता.