सर्वात दुर्दैवी माता
करू शकत नाही पिल्लांचे लाड, जन्मताच पिल्लांकडूनच होते शिकार
निसर्ग स्वत:च एक अनोखे रहस्य आहे. एकीकडे मातेला ममता आणि प्रेमाची मूर्ती मानले जाते, तर निसर्गाचे नियम इतके क्रूर आणि चकित करणारे आहेत की ते कळल्यावर धक्काच बसतो. असाच एक नियम मादी गोम (सेन्टीपीड)चा असून ती स्वत:च्या पिल्लांसाठी बलिदान देते. ही मादी स्वत:च्या पिल्लांना जन्म देताच त्यांचे पहिले भोजन ठरते. मादी गोमची पिल्लेच तिला खाऊन टाकतात.
गोमला इंग्रजीत सेंटीपीड म्हटले जाते, एक विशेष प्रकारचा कीडा असून तो स्वत:च्या शिकारी स्वभावासाठी ओळखला जातो. या कीड्याला अनेक पाय असतात, यामुळे तो भीतीदायक वाटतो. परंतु याचे सर्वात चकित करणारे वैशिष्ट्या याचे मातृत्व आहे. मादी गोम स्वत:च्या अंड्यांना एका रेशमी थैलीत स्वत:च्या पाठीवर घेऊन फिरते. ही थैली तिच्या जीवापेक्षाही अधिक मूल्यवान असते. ती याला प्रत्येक धोक्यापासून वाचविते, अंड्यांमधून पिल्लं बाहेर पडताच ती मातेच्या पाठीवरच राहतात. ही पिल्लं शिकारीच्या योग्य ठरल्यावर जे घडते, ते निसर्गाचा सर्वात क्रूर आणि धक्का देणारा नियम आहे.
मातृभक्षण नावाचे हे वर्तन मादी गोममध्ये दिसून येते. याची पिल्लं स्वत:च्या मातेलाच खाण्यास सुरुवात करतात. मादी गोम स्वत:च्या पिल्लांसाठी बलिदान देते, जेणेकरून ती मजबूत आणि तंदुरुस्त राहतील. या प्रक्रियेत मादीचा मृत्यू होतो, परंतु पिल्ले तिची ऊर्जा आणि पोषणामुळे जिवंत राहतात. हे बलिदान ममतेचे अनोखे उदाहरण आहे.
अनेक अध्ययनं
वैज्ञानिक हे वर्तन समजून घेण्यासाठी अनेक अध्ययनं करत आहेत. मादी गोमचे हे बलिदान पिल्लांसाठी एक ‘प्रारंभिक भोजना’प्रमाणे काम करते. नवजात पिल्लं इतकी, कमकुवत असतात की त्यांना त्वरित पोषणाची गरज असते. मातेचे शरीर त्यांच्यासाठी सहजपणे उपलब्ध आणि पौष्टिक भोजन असते. हे वर्तन अन्य काही कोळी म्हणजेच ब्लॅक विडो आणि स्टीटोडामध्येही दिसून आले आहे. परंतु सेन्टीपीडचे बलिदान सर्वाधिक चर्चेत राहते, कारण हे पूर्णपणे स्वैच्छिक असते. मादी स्वत:च्या पिल्लांना रोखण्याचा प्रयत्न करत नाही. तर त्यांना स्वत:चे शरीर खाण्याची अनुमती देते.