For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सर्वात मोठी शिक्षा भोगणारे गुन्हेगार

06:06 AM Feb 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
सर्वात मोठी शिक्षा भोगणारे गुन्हेगार
Advertisement

लाखो वर्षांपर्यंत राहणार गजाआड

Advertisement

कुणाला हजारो वर्षापर्यंत तुरुंगात कैद होण्याची शिक्षा केली जाऊ शकते का? एखादा माणूस  इतक्या वर्षांपर्यंत कसा जिवंत राहू शकेल असा प्रश्न उपस्थित होतो. परंतु काही प्रकरणांमध्ये गुन्हेगारांना हजारो नव्हे तर लाखो वर्षापर्यंत गजाआड राहण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

युरोपमध्ये सर्वाधिक काळापर्यंत तुरुंगवासाच्या शिक्षेचा विक्रम माद्रिद रेल्वे बॉम्बस्फोटाच्या दोषींच्या नावावर आहे. या घटनेत 193 जणांचा मृत्यू झाला होता. स्फोटात सामील तीन गुन्हेगारांना एकूण 1,20,000 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.

Advertisement

तुर्कियेतील इस्तंबुलमध्ये एका मुस्लीम टेलिवेंजिस्टला 8,658 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तो तोकडे कपडे घालणाऱ्या महिलांच्या घोळक्यात राहायचा आणि त्यांना मांजराची पिल्लं अशी हाक मारायचा असा आरोप आहे. लैंगिक शोषणाप्रकरणी दोषी ठरल्यावर त्याला ही शिक्षा देण्यात आली आहे.

 

अमेरिकेत दहशतवादी टीरे निकोल्सला 1995 मध्ये ओक्लाहोमा सिटी बॉम्बस्फोटाप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली होती. विस्फोट घडवून आणणारा माजी सैनिक टिमोथी मॅकवेला मदत करण्याचा आरोप त्याच्यावर होता. या स्फोटात 168 जण मारले गेले होते, ज्यात 19 मुलांचा समावेश होता. या गुन्ह्याकरता त्याला 161 वर्षांचा आजीवन कारावास तर पॅरोलशिवाय 9,300 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.

अन्य एका प्रकरणामध्ये 1994 साली चार्ल्स स्कॉट रॉबिन्सनला एका मुलाचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी 30 हजार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.

थायलंडच्या चमोए थिप्यासो जगातील सर्वात मोठी शिक्षा झालेल्या गुन्हेगारांपैकी एक आहे. तिचे नाव गिनिज बुक ऑफ रिकॉर्ड्समध्ये देखील नोंद आहे. एका पिरॅमिड स्कीममध्ये 16,231 लोकांची फसवणूक करणाऱ्या या महिलेला 1989 मध्ये 1,41,078 वर्षांची शिक्षा झाली होती. परंतु ती आठ वर्षांनीच तुरुंगातून बाहेर पडली होती.

Advertisement
Tags :

.