सर्वात लोकप्रिय पुस्तकांचे दुकान
पुस्तकप्रेमींसाठी ‘स्वर्ग’
जर तुम्हाला वाचनाची आवड असेल तर चीनच्या चेंगदू शहरात एक असे बुक स्टोअर आहे, जे पुस्तकप्रेमींसाठी ‘स्वर्गा’पेक्षा कमी नाही. पुस्तकांच्या या दुकानाचे नाव डुजिअंगयान झोंगशुगे आहे. याला जगातील सर्वात लोकप्रिय पुस्तकांचे दुकान मानले जाते.
आरसेयुक्त छतांच्या प्रभावात सेंटल लिटरेचर एरियाच्या दिशेने जाणारा जिना जणू थेट स्वर्गाच्या दिशेने जाणाऱ्या पायऱ्यांप्रमाणे आहे. प्रकाशासोबत छतावर 51 मेहराबोंचे प्रतिबिंब या ठिकाणाला अधिकच अद्भूत करून सोडते.
मनाला स्पर्श करणाऱ्या या बुकस्टोअरला शांघायमधील आर्किटेक्चर फर्म एक्स प्लस लिव्हिंगकडून डिझाइन करण्यात आले आहे. याच्या आतील दृश्य हॅरी पॉटर चित्रपटातील एका दृश्याप्रमाणे दिसून येते. उंच-उंच मेहराबोंच्या आत आणि बाहेर स्पायरल जिने तयार करण्यात आले आहेत, जे जमिनीपासून छतापर्यंत पुस्तकांनी भरलेले आहेत. हे बुकस्टोअर दोनमजली असून इमारतीत अत्यंत कमालीचे मिररवर्क करण्यात आले आहे. यामुळे यातील दृश्य अत्यंत अद्भूत दिसते.
हे पुस्तकांचे दुकान 2020 मध्ये सुरू करण्यात आले होते आणि हे आतापर्यंतचे सर्वात आकर्षक पुस्तकांचे दुकान ठरले आहे. येथे तुम्हाला 80 हजारांहून अधिक पुस्तके उपलब्ध होत असतात.