जगातील सर्वात विषारी प्राणी
दंशानंतर काही सेकंदांमध्ये होतो मृत्यू
पृथ्वीवर अनेक प्रकारचे प्राणी आढळतात. या सर्व प्राण्यांमध्ये स्वतःचे असे एक वैशिष्टय़ असते. यातील अनेक प्राणी अत्यंत विषारी असतात. विषारी प्राण्यांबद्दल माणसांना भीती वाटते. सर्वात विषारी प्राणी कोण हे सांगणे काहीसे अवघड आहे. अनेकांना साप तर काही जणांना अन्य प्राणी विषारी वाटतात. परंतु सर्वात विषारी प्राणी हा साप तसेच विंचू नसल्याचे जाणून तुम्ही चकीत व्हाल.
बहुतांश लोक किंग कोब्रा किंवा अनेक विंचूंना सर्वात विषारी मानतात. तर काही जण बेडकाची विशेष प्रजाती किंवा बॉक्स जेली फिशला सर्वात विषारी प्राणी मानतात. परंतु एका अहवालानुसार जगातील सर्वात विषारी प्राणी कोन स्नेल आहे.
एक मोठा विंचू स्वतःच्या शिकाराला मारण्यासाठी जितके विष वापरतो, त्याच्या दहा टक्के विष कोन स्नेल वापरून स्वतःच शिकाराला मारून टाकतो. जगात 600 हून अधिक प्रजातींमध्ये कोन स्नेल सर्वात धोकादायक आहे. कोन स्नेल क्षणांमध्ये कुणाचेही जीवन समाप्त करू शकतो.
हा जीव इंडो-पॅसिफिकच्या पर्वतीय भागांमध्ये आढळून येतो. याचा माणसांशी फारच कमी प्रमाणात संबंध येतो. याचमुळे या प्राण्याच्या विषामुळे माणसाचा मृत्यू होणे अत्यंत दुर्लभ आहे. कोन स्नेलमुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. याच्या विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी कुठलेच औषध नाही.