इतिहासातील सर्वात रहस्यमय चित्र
शतकांपासून लोकांना ठेवलंय कोड्यात
जगात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याविषयी आपल्याला पूर्ण माहिती नसते. याचमुळे हे मोठे रहस्य ठरत असते. इतिहासात असे एक चित्र आहे, ज्याला सर्वाधिक रहस्यमय चित्र म्हणून ओळखले जाते. या चित्रात अनेक रहस्य दडलेली असून त्याची उत्तरं कुणाकडेच नाहीत. शतकांपासून या चित्राने लोकांना कोड्यात पाडलं आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून यात एका विचित्र चित्राविषयी सांगण्यात आले आहे. या चित्राचे नाव ‘द अर्नोलफिनी पोर्टेट’ आहे. नेदरलँडचे चित्रकार जॅन वॅन आइक यांनी 1434 मध्ये हे चित्र साकारले होते. हे चित्र समजण्यास अत्यंत अवघड असून यात अनेक प्रकारची रहस्यं दडलेली असल्याने त्याचे कौतुक होते. चित्रात एक इसम आणि त्याची गरोदर पत्नी दिसून येत आहे. तसेच एक श्वान देखील आहे. चित्रात आणखी अनेक गोष्टी असून ज्या लक्षपूर्वक पाहिल्यास दिसून येतात.
हे चित्र अद्याप लाखो लोकांच्या कुतुहूलाचा विषय ठरले आहे. या चित्रातील रहस्यांची उकल करणे अद्याप कुणालाच शक्य झालेले नाही. हे चित्र पाहण्यासाठी लोक आजही मोठी गर्दी करत असतात.