For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सर्वात रहस्यमय पर्वत

06:43 AM Dec 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
सर्वात रहस्यमय पर्वत
Advertisement

जगात अनेक रहस्यमय जागा आहेत, परंतु स्पेनमधील टिंडाया पर्वत सर्वात अनोखा आहे. हा काही साधारण पर्वत नसून यावर चढाई करण्यास मनाई आहे. तसेच याच्या नजीक जाण्यासही लोक घाबरतात.

Advertisement

आतापर्यंत अनेक लोकांनी या पर्वताचे रहस्य दूर करण्याचा प्रयत्न केला अहे. अशाच एक ट्रॅव्हलर जोशुआ मॅककार्टनीने देखील या रहस्यमय पर्वताविषयी कळल्यावर स्पेनला जाण्याचा निर्णय घेतला. तो या पर्वताच्या नजीक जाण्यासह आसपासच्या लोकांशी बोलून रहस्याची उकल करण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. त्याने या पर्वताशी संबंधित अनेक रहस्यांची उकल केली आहे.

जोशुआने या पर्वताशी निगडित माहिती माहिती शेअर केली असून ती थक्क करणारी आहे. हा काही साधारण पर्वत नसून प्राचीन संस्कृतीचा रहस्यमय कोड आहे. टिंडाया स्पेनच्या कॅनरी आइलँड्समध्ये पुएर्तेवेंतुरा बेटावर आहे. याची उंची केवळ 400 मीटर आहे, परंतु याचा आकार अनोखा आहे. हा ट्रंकेटेड कोन सारखा दिसतो, याच्या चहुबाजूला ज्वालामुखीय शिखरे असून वाळवंटासारखा भाग आहे. परंतु खरे रहस्य याच्या आत आणि वर दडलेले आहे. या पर्वताला 1990 मध्ये शोधण्यात आले होते. पर्वताच्या शिखरावर 379 पाउलखुणा कोरण्यात आल्याचे दिसून आले होते. प्रत्येक पाऊलखुण 25-30 सेंटीमीटर लांब होती आणि कुणाच्या तरी डाव्या पायाची होती. या सर्व खुणा पश्चिमेच्या दिशेला जात होत्या, कार्बन डेटिंगद्वारे या पाऊलखुणा 2000 वर्षे जुन्या असल्याचे कळले आहे.

Advertisement

पूजा करतात लोक

स्थानिक लोक टिंडायाला ‘पवित्र पर्वत’ मानतात, येथे जादुई ऊर्जेचा संचार होतो असे त्यांचे मानणे आहे. येथील चुंबकीय क्षेत्र सामान्य स्तरापेक्षा 10 पट अधिक आहे. येथे कंपास काम करत नाही. रात्री येथून अजब प्रकाश दिसतो असे लोकांचे सांगणे आहे. तर हा एलियनचा तळ असल्याचा काही जणांचा दावा आहे. कारण पाऊलखुणा आकाशाच्या दिशेने इशारा करतात असे त्यांचे म्हणणे आहे.

सरकारकडून बंदी

1995 मध्ये हा पर्वत युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळासाठी नामांकन मिळविणारा ठरला होता. स्पेन सरकारने यावर चढाई करण्यास बंदी घातली आहे. केवळ वैज्ञानिकांना येथे गाइडसोबत जाण्याची अनुमती आहे. याचे कारण पर्वतावरील पाऊलखुणा नष्ट होऊ नयेत हे आहे.

Advertisement
Tags :

.