सर्वात ‘एकाकी’ घर
शांतता असेल अशाठिकाणी जात तेथे राहण्याचा विचार अनेकांच्या मनात दाटून येत असतो. परंतु जेथे कुणीच बोलण्यासाठी नसेल तसेच कुणाला भेटता येत नसेल तुम्ही राहणे पसंत करणार नाही. पण एक घर अशा ठिकाणी आहे, जे पूर्णपणे निर्जन आहे.
या ठिकाणी कित्येक महिन्यांपर्यंत कुणीच येत-जात नाही. येथील घराला पृथ्वीवरील सर्वात एकाकी घर मानले गेले आहे. हे घर एका दुर्गम बेटावर असून बेटासमवेत त्याची विक्री करण्यात आली आहे. अखेर जगाच्या एका टोकावर हे घर कुणी खरेदी केले आणि तो तेथे काय करत असेल असे प्रश्न उभे ठाकले आहेत.
नॉर्वेनजीक असलेल्या स्कालमेन नावाच्या बेटटावर एक असेच घर आहे, ज्याला पृथ्वीवरील सर्वात एकाकी घर मानले जाते. येथे पोहोचण्यासाठी केवळ दोन फेरीज असून ज्या 4 मैलाच्या बोट ट्रिपनंतर तेथे पोहोचतात. या ठिकाणाला पर्यटकांसाठी देखील अनेक महिन्यापर्यंत बंद ठेवले जाते, कारण हे एक संरक्षित पक्षी अभयारण्य आहे. येथे असलेल्या लाइटहाउसवर 20 वर्षांपासून कुणीच पाऊल ठेवलेले नाही. पूर्वी हे लाइटहाउस पाडविले जाणार होते, परंतु नंतर ही वास्तू विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली.
1960 मध्ये या घराची निर्मिती करण्यात आली होती. 37 लाख रुपयांमध्ये हे बेट लिलावासाठी ठेवण्यात आले होते, परंतु याच्या दुप्पट दरात सुमारे 90 लाख रुपये देत एका जोडप्याने ते खरेदी केले आहे. एंड्रियाज आणि मोना नाच्या पती-पत्नीने ते खरेदी केले असून तेथे येथे सुटी व्यतित करण्यासाठी येतात. परंतु या ठिकाणाच्या दुरुस्तीसाठी ते प्रोजेक्टवर काम करत आहेत. या ठिकाणाला पुन्हा आकर्षक स्वरुप देण्याची त्यांची योजना आहे.