महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सर्वात भुताटकीयुक्त घर

06:45 AM Oct 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मोठ्यात मोठे शूर 10 मिनिटेही टिकू शकले नाहीत

Advertisement

अमेरिकेच्या टेनेसीमध्ये एक असे घर आहे ज्याला जगातील सर्वात भीतीदायक घरांपैकी एक मानले जाते. या घराचे नाव मॅककेमी मॅनर आहे. हे घर इतके भीतीदायक आहे की येथे फिरण्यासाठी येणाऱ्या लोकांनीच याची तक्रार केली आहे. कुठलेही ठिकाण इतके भीतीदायक असणे लोकांचा छळ करण्यासारखे असल्याचे त्यांचे सांगणे होते.

Advertisement

या भुताटकीयुक्त घरात लोकांना घाबरविण्यासाठी किंवा भीतीवर विजय मिळविण्यासाठी जे लोक हिस्सा घेतात, त्यांचा मोठ्या प्रमाणात छळ केला जातो. त्यांची नखं देखील उपटून काढली जातात, भीतीच्या नावावर लोकांची दात उखडून टाकले जातात. काही लोकांनी या घराच्या मालकावर बलात्कार, बलात्काराचा प्रयत्न, हत्येचा प्रयत्न आणि अन्य गंभीर  आरोप केले आहेत.

जे लोक या भीतीदायक घरात राहण्याच्या स्पर्धेत भाग घेतात, त्यांना दात उखडुन टाकण्यासाठी भाग पाडले जाते. या हाँटेड हाउसचे संचालन करणारे येथे भीतीदायक दृश्यांमध्ये हिस्सा घेणाऱ्या लोकांना नियमित स्वरुपात टॉर्चर करतात, याचमुळे ते बंद करण्यात यावे असे अनेकांनी म्हटले आहे.

जे आरोप केले जात आहेत ते जर सत्य असते तर हे घर कधीच खुले राहिले नसते. जर माझ्याविषयी करण्यात आलेल्या सर्व भयानक गोष्टी खऱ्या असत्या तरी मी तुरुंगात असतो असे या भुताटकीयुक्त घराचे संचालन करणाऱ्या व्यक्तीने म्हटले आहे.

एका व्हिजिटरने घराच्या मालकावर एका महिलेवर बलात्कार करणे आणि तिच्या हत्येसाठी गळा आवळण्याच्या प्रयत्नाचा आरोप केला आहे. तसेच महिलेला वाहनामागे खेचून नेताना पाहिले आहे. याप्रकरणी तपास केला असता ही महिला घराच्या मालकाची प्रेयसी असल्याचे स्पष्ट झाले.

10 तास राहिल्यास मिळते इनाम

घरात 10 तास राहिल्यास आणि येथील भीषण भीतीयुक्त वातावरणात राहणाऱ्या शूर लोकांना 15,300 युरोची पुरस्कार रक्कम दिली जाते. ही रक्कम जिंकण्याच्या आशेपोटी अनेक लोकांनी 10 तासांपर्यंत यातना सहन केल्या आहेत. हे घर बंद करण्यासाठी प्रशासनाकडे अनेक अर्ज करण्यात आले आहेत, कारण काही लोक रोख रक्कम जिंकण्यासाठी काहीही करण्यास तयार होते.

8 मिनिटांपेक्षा अधिक तग धरण्यास असमर्थ

या आव्हानात भाग  घेण्यापूर्वी लोकांना 100 संभाव्य घटनांची यादी दिली जाते. हा अनुभव बहुतांश लोकांसाठी अत्यंत अधिक ठरतो. स्पर्धक केवळ 8 मिनिटांमध्येच हार मानतात. येथे येणाऱ्या लोकांची किमान वय 21 वर्षे असावे तसेच त्यांच्या आईवडिलांची सहमती असणे आवश्यक आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article