मॉरिशसमधील सर्वात प्रसिद्ध पर्वत
तुमच्या भीतीची परीक्षा पाहणारे शिखर
पीटर बोथ हे मॉरिशसमधील एक अत्यंत अद्भूत पर्वत आहे. याचे शिखर मानवी शिराप्रमाणे दिसून येते. पीटर बोथ पर्वताची चढाई प्रत्यक्षात उंचीविषयीच्या तुमच्या भीतीचीच कसोटी पाहत असल्याचे अनेक जणांचे सांगणे आहे. याचमुळे याच्या शिखरावर पोहोचणे म्हणजे एखादे युद्ध जिंकल्यासारखेच आहे. हा पर्वत स्वत:च्या नैसर्गिक सौंदर्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे.
हा पर्वत पाहताना जणू त्याने पूर्ण जग स्वत:मध्ये सामावून घेतले आहे असा भास होत असतो. हिरवाईत हरवून गेलेल्या खोऱ्या, उंच-उंच शिखरे आणि ढगांनी आच्छादून गेलेले आकाश असे चित्र तेथे दिसून येते. तसेच
पीटर बोथ पर्वताची उंची 820 मीटर (2690 फूट) इतकी आहे. हा पिटोन डे ला पेटिट रिवियेर नोइरेनंतर मॉरिशसमधील दुसऱ्या क्रमांकाचा उंच पर्वत आहे. हा पर्वत मोका पर्वतरांगेत असून ती बेटाच्या मध्यवर्ती स्थानी आहे.
का प्रसिद्ध आहे पर्वत?
या पर्वताचे नाव डच ईस्ट इंडीजचे पहिले गव्हर्नर जनरल पीटर बोथ यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे. हा पर्वत स्वत:चे भव्य शिखर, हिरवेगार डोंगर आणि वन्यजीवांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. पर्वतावर चढाई म्हणजे हायकिंग करणऱ्या लोकांसाठी हे पसंतीचे ठिकाण आहे. कारण त्यांना येथे अॅडव्हेंचरसोबत नैसर्गिक सौंदर्याचा देखील आनंद घेता येतो.