महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सर्वात महाग भाज्या

06:01 AM Nov 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

एका किलोच्या किमतीत अनेक तोळे सोने खरेदी शक्य

Advertisement

भाज्यांचे दर सध्या अत्यंत चढे आहेत. अशा स्थितीत लोक अनेकदा भाज्यांच्या दराची तुलना आता सोन्याशी करू लागले आहेत. भाज्या महागल्याने गरीब अन् कनिष्ठ मध्यमवर्गीयांना फटका बसत असतो. परंतु काही भाज्या या सोन्यापेक्षा अधिक महाग असल्याची कल्पना आहे का? जगातील सर्वात महाग भाज्यांच्या दरात तुम्ही दोन तोळे सोने खरेदी करू शकता.

Advertisement

व्हाइट ट्रफल : युरोपमध्ये आढळणारे व्हाइट ट्रफल जगातील सर्वात महाग ट्रफल आहे. याची किंमत 5 लाख रुपये प्रतिकिलोपर्यंत असते. याचा स्वाद लसूण आणि पनीरसारखा असतो.

मत्सुटेक मशरुम : जपानमध्ये आढळणारा मत्सुटेक मशरूम जगातील सर्वात महाग मशरूम आहे. याचा स्वाद गोड आणि सुगंधित असतो. परंतु याची किंमत तुम्हाला धक्का देणारी असू शकते.  याची किंमत दीड लाख रुपये प्रतिकिलोपर्यंत असू शकते.

ला बोनोटे बटाटा : दुर्लभ प्रजातीचे हे बटाटे फ्रान्सच्या किनारी भागातच तयार होतात. दरवर्षी केवळ 10 दिवसांसाठीच याचे पिक येते. हे बटाटे खाण्यात काहीसे नमकीन असतात आणि याच्या एक किलो बटाट्याचे दर एक लाख रुपये असतो.

हॉप शूट : उत्तर अमेरिकेत आढळणाऱ्या हॉप शूटचा वापर बियर तयार करण्यासाठी केला जातो. तसेच याचा वापर औषधांच्या निर्मितीतही होत असतो. याची अनुमानित किंमत 73 हजार रुपये आहे.

यार्ट्सा गुंबू : हा एक प्रकारचा किडा असून तो तिबेट आणि नेपाळमध्ये आढळतो. याला जगातील सर्वात महाग भाजी देखील ठरविले जाते. याची किंमत सोन्यापेक्षाही अधिक आहे.

या भाज्या खाण्याचे लाभ

या भाज्यांमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळून येतात, ते मानवी आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असतात. यात व्हिटॅमिन, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असतात. या भाज्या रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यास मदत करतात आणि अनेक आजारांपासून वाचवितात.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article