सर्वात महाग साबण
खास लोकच करू शकतात वापर
साबण हा दैनंदिन गरजेची वस्तू ठरला आहे. याच वापर जगभरात केला जातो. सर्वसाधारणपणे साबण 10 ते 50 रुपयांपर्यंत मिळतो. परंतु एका साबणाची किंमत लाखो रुपये आहे. जगातील सर्वात महाग साबण लेबनॉनच्या त्रिपोली शहरात प्रसिद्ध कंपनी बदर हसन अँड सन्सकडून निर्माण केला जातो. हा साबण शतकांपेक्षा जुनी परंपरा आणि खास लाभकारी तेल आणि नैसर्गिक सुगंधांचा वापर करत हाताने तयार केला जातो. कंपनी 15 व्या शतकापासून या लक्झरी साबणाचे उत्पादन करत आहे. यात प्राचीन पद्धतींना आधुनिक विलासितेशी जोडण्यात आले आहे. या साबणाच्या निर्मितीत वापरण्यात आलेली सामग्री अत्यंत मूल्यवान आहे. याच्या सर्वात महाग साबणात सोन्याची पावडर आणि हिरे जडविलेले असतात. हे स्वच्छता उत्पादनासोबत एक कलाकृती देखील आहे.
या सुंदर साबणात काळजीपूर्वक निवडण्यात आलेले नैसर्गिक तेल आणि सुगंधांमुळे अत्यंत लाभदायक गुण मिळतात. या साबणांना सामान्य दुकानांमध्ये विकले जात नाही. संयुक्त अरब अमिरातच्या विशेष दुकानांमध्येच हा साबण मिळतो. याचबरोबर हा खास आणि सर्वात महाग आवृत्ती केवळ निवडक ग्राहकांसाठीच तयार केला जातो. या साबणाचा आकार पनीरच्या तुकड्यासारखा होता, परंतु नंतर तो बऱ्याच अंशी बदलण्यात आला. आता या साबणावर 24 कॅरेट सोन्याचे आवरण दिले जाते, ज्यामुळे हा पाहण्यास आणखी सुंदर दिसतो. या साबणाची किंमत 2800 डॉलर्स प्रति बार आहे. केवळ सफाईसाठी नव्हे तर हा साबण एक स्टेट्स सिंबल देखील आहे. लेबनॉनमध्ये या साबणाचे उत्पादन तेथील समृद्ध संस्कृती वारसाही दर्शविते. आधुनिक विलासितेला पारंपरिक तंत्रज्ञानासोबत मिळून कंपनीने दैनंदिन गरजेच्या वस्तूला शाही प्रतीकाच्या स्वरुपात बदलले आहे.