सर्वात महाग गुलाब
याच्या खरेदीसाठी करावा लागेल मोठा खर्च
गुलाब जगातील सर्वात सुंदर फुलांपैकी एक असल्याचे मानले जाते. याला सौंदर्य आणि प्रेमाचे प्रतीक देखील मानले जाते. अनेक प्रकारचे गुलाब तुलनेत अधिक दरात विकले जातात. त्यांच्या वाढत्या किमतीचे कारण त्यांच्या सुंदरतेसोबत त्यांचे दुर्लभत्व आणि गंध देखील मानला जातो. परंतु जगातील सर्वात महाग फूल गुलाबाचे एक फूल मानले जाते, त्याचे नाव देखील काहीसे रोमँटिक आहे, ज्युलियट रोज असे नाव असलेल्या फुलाची किंमत कोट्यावधी रुपयांमध्ये आहे.
ज्युलियट रोज नावाचे हे गुलाब अत्यंत दुर्लभ मानले गेले. सुंदर अन् गंधयुक्त असण्यासोबत याच्या दुर्लभतेमुळे याला मोठी किंमत मिळाली. हे गुलाब तयार करण्यास सुमारे 30 लाख डॉलर्स खर्च झाले होते. या गुलाबाला डेव्हिड ऑस्टिन नावाच्या इसमाने अनेक गुलाबांच्या रोपांना मिळून तयार केले होते. हे फुल उगविण्यासाठी सुमारे 15 वर्षांचा कालावधी लागला होता. आज भले 4-6 आठवड्यांमध्ये याच्या रोपातून फुल उगवत असले तरीही अद्यपा खास प्रकारची स्थिती आणि खास देखभाल आवश्यक असते. हे पाहण्यास अत्यंत सुंदर आहे, याचबरोबर याचा सुगंध याला खास स्वरुप प्राप्त करून देतो.
पीच कलरच्या याच्या पाकळ्या अत्यंत मोहक प्रकारचे कॉम्बिनेशन तयार करताना दिसून येतात. यात काठावर पांढरा रंग आणि मधल्या भागात पीच कलर अधिक खुलून दिसतो. ज्युलियट रोजच्या किमतीचे वेगवेगळे आकलन झाले आहे. 2006 मध्ये एका प्रदर्शनात विकले गेलेले हे फुल जगातील सर्वात महाग गुलाबाचे फुल ठरले होते आणि हा विक्रम आजही कायम आहे. त्यावेळी त्याची किंमत 15.8 दशलक्ष डॉलर्स होती, आताच्या मूल्यात ही किंमत 15 कोटी 30 लाख रुपये इतकी ठरेल.