सर्वात महाग पर्सला 80 कोटीची किंमत
अभिनेत्री, गायिका आणि फॅशन आयकॉन जेन बिर्किनसाठी 1984 मध्ये निर्माण करण्यात आलेली हर्मेस बिर्किन हँडबॅग लिलावात 7 दशलक्ष युरोंमध्ये (8.18 दशलक्ष डॉलर्स) विकली गेली आहे. शुल्कासह यासाठी अंतिम बोली लावणाऱ्या व्यक्तीला 8.58 दशलक्ष युरो म्हणजेच 10 दशलक्ष युरो खर्च करावे लागले. अशाप्रकारे ही पर्स आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात महाग पर्स ठरली आहे. भारतीय रुपयात याची किंमत 80 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.
या सर्वात महाग बॅगच्या खरेदीदाराचे नाव उघड करण्यात आले नव्हते, आता साकिमोतो हे नाव समोर आले आहे. जपानी रिसेल दिग्गज शिंसुके साकिमोतो नावाच्या व्यक्तीने 1984 च्या प्रोटोटाइप बॅगला खरेदी केले आहे.
साकिमोतो यांनी या बॅगसाठी अंतिम बोली लावली होती, यामुळे ही प्रतिष्ठित पॅशन कलाकृती इतिहासातील सर्वात महाग पर्स ठरली आहे. साकिमोतो हे वॅल्यूएंस होल्डिंग्सचे सीईओ आहेत. ही आतापर्यंतची माझी कुठल्याही वस्तूची सर्वात महाग खरेदी होती. हे अत्यंत रोमांचक होते, असे त्यांनी म्हटले आहे.
का आहे खास?
ही ब्रिटिश ‘इट गर्ल’ जेन बिर्किनसाठी डिझाइन करण्यात आली होती. जेन बिर्किन एक अभिनेत्री, गायिका आणि मॉडेल होती. तिच्या नावामुळेच या पर्सला बिर्किन बॅग हे नाव मिळाले. जेन बिर्किनचा 2023 मध्ये मृत्यू झाला होता, परंतु मृत्यूपूर्वी तिने जवळपास दरदिवशी या बॅगचा वापर केला होता. 2000 साली या प्रतिष्ठित बॅगचा मालक बदलला होता, एका खासगी लिलावात या हँडबॅगला फ्रेंच संग्राहक कॅथरीन बेनियर यांना अज्ञात रकमेत विकण्यात आले होते. बेनियर यांनी मागील 25 वर्षांपासून ही बेनियर यांनी मागील 25 वर्षांपासून या हँडबॅगला स्वत:कडे ठेवले होते. आता सोथबीमध्ये याचा लिलाव झाला आहे.
हिमालया क्रोकोडायल बिर्किन
उच्चगुणवत्तायुक्त ही बॅग मागील महिन्यात पॅरिसच्या सोथबीमध्ये एका लिलावात विकली गेली आहे. सोथबीने पॅरिसमध्ये 9 संग्राहकांदरम्यान 10 मिनिटांपर्यंत चाललेल्या बोली प्रक्रियेदरम्यान या वस्तूचा लिलाव केला. तर यापूर्वी लिलावात विकली गेलेली सर्वात महाग हँडबॅग हिमालय क्रोकाडाइल बिर्किन होती. 2022 मध्ये याची 4 लाख 50 हजार डॉलर्समध्ये विक्री झाली होती.
बिर्किन बॅगची कहाणी
मूळ बिर्किन बॅगच्या आकर्षणाला शब्दांत व्यक्त करणे कठिण आहे. लंडनमध्ये जन्मलेल्या दिवंगत स्टारसाठी ही तयार करण्यात आली होती. एका विमानात तिची बिर्किन बॅग तयार करणारी कंपनी हर्मीसचे सीईओ जीन-लुई डुमास यांच्याशी भेट झाली होती. जेन बिर्किन विमानात एका हातात पात्र घेऊन उभी होती. तिच्या बाजूला बसलेल्या इसमाने तिला तुम्ही एक बॅग घ्यायला हवी असे सांगितले. हा इसम हर्मीस कंपनीचा सीईओ जीन-लुई डुमास होता. त्यांनी विमानात वापरल्या जाणाऱ्या वोमिटिंग बॅगवर या पर्सचे डिझाइन तयार केले आणि काही महिन्यांनी बॅग तयार असल्याचा फोन आला, हीच ती बिर्किन पर्स होती, ज्याचा लिलाव करण्यात आला आहे.