For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

सर्वात महागडे परफ्यूम

06:20 AM Mar 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
सर्वात महागडे परफ्यूम

किंमत जाणून घेतल्यावर बसेल धक्का

Advertisement

जगातील बहुतांश लोकांना परफ्यूम आवडते. अशा स्थितीत कुणी लोकल ब्रँडचा परफ्यूम वापरतो, तो तुलनेत स्वस्त असतो. तर काही लोक स्वत:साठी विशेष परफ्यूम तयार करवून घेत असतात. याकरता ते मोठी रक्कम देखील खर्च करतात. जगातील सर्वात महागडा परफ्युम खरेदी करण्यासाठी अब्जावधी रुपयांचा मालक असणे आवश्यक आहे.

या परफ्यूमची किंमत ऐकल्यावर धक्काच बसतो. हा परफ्यूम एका खास व्यक्तीसाठी तयार करण्यात आला होता, या परफ्यूमची डबीच कोट्यावधी रुपयांची होती. या परफ्यूमची निर्मिती फ्रेंच कंपनी मॉरेलेकडून करण्यात आली होती. या परफ्यूमचे नाव मोंडे सुर मेसुर आहे.

Advertisement

5 किलोग्रॅमच्या या परफ्यूमला एका अज्ञात खरेदीदाराने सुमारे 15 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. या परफ्यूममध्ये त्या खरेदीदाराने स्वत:चा गंध डिझाइन केला हेता. अखेर ही बॉटल कोट्यावधी रुपयांची कशी झाली असा प्रश्न उपस्थित होतो. परंतु 5 किलोच्या या परफ्यूमच्या डब्याला विशेष स्वरुपात डिझाइन करण्यात आले होते, ज्यात 2 किलो सोन्याचा वापर करण्यात आला होता. याचबरोबर 1 हजार हिरे जडविण्यात आले होते. हा खरेदीदार नेमका कोण होता याची माहिती कधीच समोर आलेली नाही.

Advertisement

हा विशेष परफ्यूम तयार करणे अत्यंत कठिण होते. अशाप्रकारच्या परफ्यूमच्या निर्मितीसाठी एक वर्षांपर्यंत 35 लोकांनी काम करण्याची गरज असल्याचे बोलले जाते. परफ्यूमच्या उत्तम सुगंधासोबत त्याच्या डब्यालाही प्रभावीपणे डिझाइन करण्याची गरज असते. या परफ्यूमकडे पाहताच लक्झरी फिलिंग येते. परंतु हे विशेष मागणीनुसार तयार करण्यात आलेले जगातील सर्वात महाग परफ्युम आहे.

अन्य एक परफ्यूम कुणीही खरेदी करू शकतो, परंतु त्याची किंमत देखली कोट्यावधींमध्ये आहे. या परफ्यूमची निर्मिती क्लाइम क्रिश्चियन कंपनीने पुरुषांसाठी केली होती. याचे नाव इंपीरियल मेजेस्टी परफ्यूम आहे. याच्या बॉटलला प्रतिष्ठित फ्रेंच कंपी बॅकारेटकडून निर्माण करण्यात आले होते. ही बॉटल परफ्यूमला आणखी विशिष्ट स्वरुप प्राप्त करून देते. तसेच लक्झरियस लुक प्रदान करते. क्लाइव क्रिश्चियनने या परफ्यूमची एकूण 10 बॉटल्स तयार केल्या, यातील एका बॉटलची किंमत 3 कोटी 64 लाख रुपयांपेक्षा अधिक होती. या परफ्यूमच्या बॉटलला तयार करण्यासाठी अद्भूत कौशल्याचा वापर करण्यात आला होता.

Advertisement
Tags :
×

.