सर्वात महाग मद्य
एका पेगच्या किमतीत खरेदी कराल आलिशान फ्लॅट
जगातील सर्वात महाग व्हिस्कीचा मान इसाबेला इस्ले या ब्रँडच्या नावावर आहे. याची एक बॉटल 60 लाख डॉलर्स तर भारतीय चलनात सुमारे 52 कोटी रुपयांमध्ये मिळते. स्वत:च्या आकर्षक पॅकेजिंगसोबत याला चांगल्याप्रकारे जुन्या प्रीमियम व्हिस्कीच्या गुणवत्तेसाठी ओळखले जाते. व्हिस्कीचा हा इंग्लिश क्रिस्टल डिकँटर प्रत्यक्षात हिऱ्यांनी जडविलेली एक कलाकृती आहे. यात 8500 हून अधिक हिरे आणि 300 माणिकं (रुबी) जडविण्यात आलेले आहेत. याचबरोबर व्हाइट गोल्डचा यात वापर करण्यात आला.
याच्या बाटलीवरील हिऱ्यांच्या अक्षरांना खरेदीदाराच्या पसंतीनुसार बदलले जाऊ शकते. याचबरोबर समोरील बाजूस असलेला लाल रंगातील मजकूर सुमारे 300 माणिकांनी तयार करण्यात आलेला आहे. याचबरोबर या महागड्या बाटलीवर दोनवेळा व्हाइट गोल्डचे आवरण देण्यात आले आहे. ही बाटली उत्कृष्ट ब्रिटिश कारागिरीचा नमुना आहे. याची प्रत्येक बाटली लाकडाच्या एका आलिशान केसमध्ये ठेवण्यात येते. याचबरोबर इसाबेला ओरिजिनलची किंमत 6 दशलक्ष डॉलर्स इतकी आहे.
इसाबेला इस्ले व्हिस्कीच्या एका बाटलीची किंमत 52 कोटीच्या आसपास आहे. बाटलीत 750 मिलीलिटर मद्य असते. जर याच्या 30 एमएलच्या एका पेगची किंमत काढल्यास ती 2 कोटी रुपयांपेक्षा अधिक ठरणार आहे. म्हणजेच या व्हिस्कीच्या एका पेगच्या किमतीत तुम्ही आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल. इसाबेलाच्या इस्ले ओरिजिनल व्हिस्कीची निर्मिती ब्रिटनमधील स्पिरिट्स कंपनी लक्झरी बेवरेजकडून केली जाते. ही माल्टेड जौच्या मॅशपासून तयार केली जाते.
इस्ले स्पेशल एडिशन
इसाबेला स्पेशल एडिशन व्हिस्कीची किंमत 7 लाख 40 हजार डॉलर्स प्रति बॉटल आहे. हे पेय एक हस्तनिर्मित इंग्लिश क्रिस्टल डिकँटरमध्ये हाताने बाटलीबंद केले जाते. डिकँटर व्हाइट गोल्डने आच्छादलेले असते आणि त्यावर हिरे जडविण्यात आलेले असतात. इसाबेल इस्ले स्कोटा प्रीमियम व्हिस्की स्कॉटलंडचे पौराणिक संस्थापक फराओ यांची कन्या स्कोटाला श्रद्धांजली अर्पण करणारी आहे. स्कोटाने एक सेल्टिक राजकुमाराशी विवाह केला आणि त्याचे वंशज स्कॉटलंडमध्ये स्थायिक झाले, यामुळे स्कॉटिश लोकांचा जन्म झाल्याची वदंता आहे.