सर्वात महाग द्राक्षं
एका गुच्छाच्या किमतीत खरेदी करू शकता कार
जगभरात द्राक्षांच्या अनेक प्रजाती आढळून येतात. बाजारात सहजपणे 100 रुपयांच्या आसपासच्या दरात एक किलो द्राक्ष मिळतात. परंतु द्राक्षांची एक प्रजाती प्रचंड महाग आहे. द्राक्षांच्या या प्रजातीचे नाव ‘रुबी रोबन’ असून ती लाल रंगाची असतात. 1995 मध्ये द्राक्षाच्या या प्रजातीला विकसित करण्यात आले. जपानच्या इशिकावामध्ये द्राक्षाच्या या प्रजातीला विकसित करण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रीफेक्चुरल अॅग्रिकल्चर रिसर्च सेंटरने आवाहन केले होते. रिसर्च सेंटरने 400 द्राक्षांच्या वेलींवर सुमारे 2 वर्षांपर्यंत प्रयोग केले. द्राक्षाच्या 400 वेलींपैकी केवळ 4 मध्ये लाल रंगाची द्राक्षं तयार झाली. या 4 द्राक्षांपैकी एका प्रजातीने शेतकऱ्यांची मने जिंकली.
रुबी रोमन द्राक्षाला ‘इशिकावाचा खजिना’ही म्हटले जाते. याच्या शेतीदरम्यान द्राक्षाच आकार, स्वाद आणि रंगाची विशेष काळजी घेतली जाते. या खास प्रजातीच्या एका द्राक्षाचे वजन सुमारे 20 ग्रॅम असते. तर एका गुच्छात सुमारे 24 द्राक्षं असतात.
जपानमध्ये रुबी रोमन द्राक्षाची किंमत सुमारे 9 लाख रुपये असते. अधिक किमतीमुळे हे लाल रंगाचे फळ खासकरून श्रीमंतांच्s फळ म्हणून ओळखले जाते. ही द्राक्षं अत्यंत गोड असतात. जपानमध्ये रुबी रोमन लक्झरी फळांच्या श्रेणीत येते, शुभप्रसंगी गिफ्ट म्हणून हे फळ दिले जाते. रुबी रोमन अत्यंत दुर्लभ द्राक्षं असल्याने ते अत्यंत महाग आहे. आकारात हे इतर द्राक्षांपेक्षा चारपट मोठे असते. तसेच अधिक गोड अन् रसयुक्त असते. या द्राक्षाच्या एका गुच्छाची किंमत 9 लाख रुपये असते. म्हणजेच एक द्राक्ष सुमारे 25 हजार रुपयांना मिळत असते.