जगातील सर्वात महाग फळ
कोटय़धीशालाही परवडणे अवघड
आहारात फळांचा वापर करा असे डॉक्टर सांगत असतात. फळांच्या सेवनाने मनुष्याला आवश्यक व्हिटॅमिन्स प्राप्त होतात, तसेच पोटांच्या आजारांपासून आपल्याला दूर ठेवतात. परंतु जगातील सर्वात महाग फळ कुठले हे तुम्हाला माहित आहे का? जगातील सर्वात महागडय़ा फळाचे नाव यूबरी मेलन आहे.
यूबरी मेलन या फळाचे पिक प्रामुख्याने जपानमध्ये घेतले जाते. या फळाच्या आतील भाग नारिंगी रंगाचा असतो तर बाहेरील हिस्सा हिरव्या रंगाचा असतो. त्यावर पांढऱया रंगाच्या रेषा असतात. भारतात आढळून येणाऱया खरबूजाप्रमाणेच हे फळ दिसते.
या फळाचे पीक सूर्यप्रकाशात घेतले जाऊ शकत नाही, हे केवळ ग्रीन हाउसमध्येच मिळविता येते. याचबरोबर हे फळ पिकण्यासाठी जवळपास 100 दिवसांचा कालावधी लागत असतो. तसेच हे फळ फळांच्या दुकानांमध्ये दिसून येते. जपानच्या यूबरी येथेच या फळाचे उत्पादन होते, म्हणूनच या फळाला असे नाव पडले असावे.
भारतीय रुपयांमध्ये या फळाची किंमत एक किलोमागे 10 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. म्हणजेच या फळाचे काही किलोग्रॅम पीक मिळाले तर संबंधित व्यक्ती कोटय़धीश होऊन जाईल. म्हणूनच भारतासारख्या देशात या फळझाडाची लागवड केली जात नसावी. याच्यासाठीचा खर्च देखील तितकाच अधिक असणार आहे.
सामान्यांच्या आवाक्याबाहेर
या फळाची विक्री जपानमध्ये लिलावाद्वारे होत असते. 2019 मध्ये लिलावाच्या या 466 फळांना 5 दशलक्ष येनमध्ये विकले गेले होते. या फळांचा दर अत्यंत अधिक असल्याने सामान्य व्यक्ती त्याची खरेदी करू शकत नाही. हे फळ खाल्ल्याने बुद्धी तल्लख होत असल्याचे मानले जाते.