For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जगातील सर्वात महाग सफरचंद

06:18 AM Jul 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
जगातील सर्वात महाग सफरचंद
Advertisement

का आहे महाग?

Advertisement

आरोग्यासाठी सफरचंद अत्यंत चांगले फळ मानले जाते. डॉक्टर हे फळ खाण्याचा सल्ला दातात. जगभरात सफरचंदाचे 7500 हून अधिक प्रकार आढळून येतात. यातील एका सफरचंदाचे पीक भारताच्या शेजारी घेतले जाते आणि ते सर्वात महाग सफरचंद म्हणून ओळखले जाते. या सफरचंदाला 6000-8000 रुपये किलोपर्यंत दर मिळतो. एका सफरचंदाची किंमत 1500 रुपयांपर्यंत असते.

तिबेट आणि भूतानच्या पर्वतीय क्षेत्रांमध्ये या सफरचंदाच्या बागा असतात. याला हुआ नियु नावानेही ओळखले जाते. याचा रंग काळा असतो आणि जांभळ्या रंगाचेही फळ आढळून येते. याचमुळे याला ब्लॅक डायमंड म्हटले जाते. हे सफरचंद मुख्यत्वे चीनच्या तिबेटी पठाराच्या न्यिंगची क्षेत्रात तयार होते. एका ब्लॅक डायमंड अॅपलची किंमत जवळपास 5000 ते 1600 रुपयापर्यंत असते. भारतात चांगल्या प्रतीचे सफरचंद देखील 500 रुपये किलोपर्यंत मिळते. परंतु ब्लॅक डायमंड सफरचंद याहून 15 पट अधिक महाग आहे. विशेष गिफ्ट पॅकिंगमध्ये याचे एक फळ 2000 ते 5000 रुपयांपर्यंतही विकले जाते.

Advertisement

कशी असते चव?

ब्लॅक डायमंड सफरचंदाचा स्वाद गोड, मुलायम आणि क्रिस्पी असतो. याला आंबडगोड स्वादासोबत एक अनोखा अनुभव मानले जाते. ज्यात नैसर्गिक ग्लुकोजचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे हे असाधारण स्वरुपात गोड लागते. याची जाड साल याला चमकदार स्वरुप देते. याचा स्वाद अत्यंत ताजेपणा देणारा असतो.  ब्लॅक डायमंड अॅप्पलचा दाट जांभळा रंग एंथोसायनिनने भरपूर असतो. जो एकप्रकारचा अँटीऑक्सिडेंट आहे. अँटीऑक्सिडेंट सूज कमी करणे, प्रतिरक्षा प्रणालीला चालना देणे आणि हृदयविकार तसेच कॅन्सरसारख्या जुन्या रोगांची जोखीम कमी करण्यासाठी ओळखला जातो.

या फळाच्या स्वादात आंबटगोडाचे संतुलन याला सामान्य लाल किंवा हिरव्या रंगाच्या सफरचंदापासून वेगळे स्वरुप देते, असे म्हटले जाऊ शकते. हे तिबेटच्या उंच पर्वतांवर पिकत असल्याने यावर अल्ट्रावॉयलेट किरणांचाही प्रभाव अधिक असतो. याचमुळे याचा रंग आणि स्वाद अनोखा होतो. सूर्याची अल्ट्रावॉयलेट किरणे जेव्हा या फळावर थेट पडतात, तेव्हा रंग काळा किंवा जांभळा होतो. ब्लॅक डायमंड सफरचंदाला निसर्गाचा चमत्कारही म्हटले जाते, ज्यात आश्चर्यकारक सुंदरता, अद्वितीय स्वाद आणि प्रभावशाली आरोग्य लाभ सामील आहेत. परंतु हे फळ दुर्लभ आणि विशिष्ट असल्याने याची लोकप्रियता वाढत चालली आहे.

भारतात मिळते का?

ब्लॅक डायमंडच्या बागा तिबेटच्या पर्वतांमध्ये 2015 मध्ये सुरू झाल्या. हे फळ सर्वसाधारणपणे चीनच्या मोठ्या शहरांध्ये लक्झरी फ्रूटच्या स्वरुपात विकले जाते. ब्लॅक डायमंड सफरचंद हिमाचल प्रदेश आणि काश्मीरच्या थंड पर्वतीय क्षेत्रांमध्येही उगविले जाते, परंतु अत्यंत मर्यादित पद्धतीने. बिहारमध्येही याचे पीक घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Advertisement
Tags :

.