कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सर्वात धोकादायक मार्ग

06:30 AM Apr 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जर कुणी उत्तमप्रकारे वाहन चालविणे जाणत असेल तर त्याला रस्त्यावर घाबरण्याची गरज भासत नाही. तो स्वत:च्या कौशल्याने सहजपणे वाहन चालवू शकतो. परंतु जगातील काही रस्ते असे आहेत, जे अत्यंत धोकादायक असून तेथे  ड्रायव्हिंगमध्ये पारंगत चालक देखील घाबरत असतो. अशाच प्रकारचा एक रास्ता तुर्कियेमध्ये असून तेथे कमकुवत हृदय असलेला व्यक्ती वाहन चालवू शकत नाही.

Advertisement

पूर्व तुर्कियेत ऑफ आणि बेबर्ट नावाच्या दोन शहरांना एक रस्ता जोडतो, तो 105 किलोमीटर लांबीचा आहे. याचे नाव डी915 आहे. या रस्त्याला जगातील सर्वात धोकादायक रस्ता मानले जाते. हा रस्ता तुर्कियेच्या उत्तर-पूर्व एंटोलिया प्रांताला काळ्या समुद्राशी जोडतो, या रस्त्यावर अनेक अवघड वळणं असून त्यावरून वाहने चालविणे अत्यंत अवघड आहे.

Advertisement

रस्त्याचा जुना इतिहास

या रस्त्याचा इतिहास 1916 शी जोडलेला असून तेव्हा रशियन सैन्याने ट्रॅबजॉन नावाच्या शहरावर कब्जा केला होता. त्यावेळी सैन्याने हाताने वापरता येणाऱ्या अवजारांच्या मदतीने या रस्त्याची निर्मिती केली होती. त्यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला काही भागांवर डांबर पसरविण्यात आले होते, परंतु बहुतांश भाग अद्याप ठोस नाही, प्रारंभी हा रस्ता धोकादायक वाटणार नाही, परंतु जसजसा प्रवास पुढे सरकतो, तसतशी भीती वाढत जाते. या रस्त्यावर 38 अत्यंत तीव्र वळणं असून त्यांना हेयरपिन टर्न म्हटले जाते, परंतु यातील सर्वात धोकादायक वळणाचे नाव डेरेबासी आहे.

अत्यंत धोकादायक

अशाप्रकारच्या 17 वळणांना सामोरे जात हा प्रवास करावा लागतो, यादरम्यान सुमारे 5 किलोमीटरचे अंतर कापावे लागते, समुद्रसपाटीपासून 5600-6600 फूटांच्या उंचीवर हा रस्ता आहे. या रस्त्याच्या कडेला कुठलाच गार्ड रेल निर्माण करण्यात आलेला नाही, यामुळे वाहन सरकल्यास थेट खाली कोसळण्याचा धोका असतो. या रस्त्याच्या एका ठिकाणी तो अत्यंत अरुंद असून तेथून एकावेळी एकच वाहन पुढे जाऊ शकते. हवामान खराब असल्यास हा रस्ता आणखी धोकादायक होतो. हिमवृष्टी, पावसामुळे हा रस्ता ऑक्टोबर ते जूनदरम्यान बंद असतो.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article