जगातील सर्वात धोकादायक खडक
साहसी लोकच ठेवू शकतात पाऊल
नॉर्वेमध्ये जेराग्बॉल्टन एक अनोखा खडक आहे. तो केजेराग माउंटन रिजनमध्ये 2 टेकड्यांदरम्यान अडकून पडलेला आहे. याची उंची पृष्ठभागापासून 3200 फुटांपेक्षा अधिक आहे. याला जगातील सर्वात धोकादायक खडकांपैकी एक मानले जाते, ज्यावर साहसी लोकच पाऊल ठेवू शकतात. अनेक अडचणींवर मात करत येथे मोठ्या संख्येत पर्यटक पोहोचत असतात. आता याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
जेराग्बॉल्टन नॉर्वेमध्ये माउंट केजेरागवर एक खडक आहे. हा जमिनीवरून 3200 फुटांपेक्षा अधिक उंचीवर 2 टेकड्यांमध्ये अडकून पडला असल्याचे या व्हिडिओच्या कॅप्शनदाखल नमूद करण्यात आले आहे. जेराग्बॉल्टन येथे पोहोचल्यावर लोकांना तेथे पर्वत, खोरे, नदी आणि दूरपर्यंत फैलावलेला आसंमत दिसून येतो, यामुळे तेथे एका वेगळ्याच जगाची अनुभूती होत असते.
जेराग्बॉल्टन एक रोमांचक स्थळ असून तेथील नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करत असते. येथे साहसी लोक स्वत:ची छायाचित्रे काढून घेण्यासाठी रांगेत उभे राहून प्रतीक्षा करत असतात. केजेराग्बोल्टेन एक लोकप्रिय ट्रेकिंग स्थळ देखील आहे. लिसेबोटन गावात पोहोचल्यावर पायी प्रवास करत इथपर्यंत पोहोचता येते.
जेराग्बॉल्टन खडकाचा आकार 5 क्यूबिक मीटर इतका आहे. हा खडक आकारात गोल असून तो एखाद्या झोपलेल्या व्यक्तीच्या डोक्याप्रमाणे दिसतो. हा खडक 984 मीटर खोल दरीवर लटकलेला आहे.