चीनमधील सर्वात धोकादायक रस्ता
जगभरात एकाहून एक धोकादायक मार्ग आहेत, जेथे वाहन चालविण्यापूर्वी चालकांना मोठा विचार करावा लागतो. बोलिवियाचा डेथ रोड असो किंवा काराकोरम हायवे असो, तसेच लडाखचा जोजी ला दर्रा असो किंवा अलास्काचा जेमस डाल्टन हायवे असो, यापैकी अनेक मार्ग बर्फाळ जंगलातून जातात, तर काही उंच पर्वतांवरून. परंतु एका रस्त्यावर वाहन चालविण्याचे धाडस सहजासहजी कुणी करू शकणार नाही. हा रोड पाहिल्यास तो रोड आहे का साप असा प्रश्न मनात येऊ शकतो.
ताइहांग माउंटनवर निर्माण करण्यात आलेला हा रस्ता चीनचा प्रसिद्ध पर्वतीय मार्ग आहे. हा मार्ग उंच पर्वत आणि त्यावर निर्माण करण्यात आलेल्या भुयारांमधून जातो. हा रस्ता अदभूत परंतु धोकादायक दृश्य दाखवतो. हा अत्यंत अरुंद रस्ता असल्याने ड्राइव्ह करताना आव्हानांना तोंड द्यावे लागू शकते. हा रस्ता उत्तर चीनमधील हेनान, शांक्सी आणि हेबेई प्रांतांमध्ये स्थित आहे. हा रस्ता आकाशातून पाहिल्यास पांढऱ्या रंगाच्या सर्पाकार आकृतीत दिसून येतो. या रस्त्यावर हार्डकोर ड्रायव्हर देखील वाहनाचा वेग कमी करत असतात.