सर्वात धोकादायक पिझ्झा
थेट ज्वालामुखीवर होतो तयार
काही लोकांना स्वादापेक्षा अॅडव्हेंचरस ठिकाणी खाणे पसंत असते. अशाप्रकारच्या लोकांना ग्वाटेमाला येथील मारियो डेव्हिड ग्रासिया नावाचा शेफ थेट ज्वालामुखीवर पिझ्झा तयार करून खायला घालत आहे. मी अनेक प्रकारच्या गोष्टी विकल्या परंतु मला केवळ यातच यश मिळाल्याचे त्याचे सांगणे आहे.
या पिझ्झाला धोकादायक म्हटले जात आहे कारण हा कुठल्याही ओव्हनमध्ये नव्हे तर थेट ज्वालामुखीची धगधग आणि राखेदम्यान तयार केला जातो. ज्वालामुखीच्या तप्त राखेत या पिझ्झाला ठेवून तयार केले जाते. अशा स्थितीत याच्या स्वादासोबत विषारी वायू आणि तेथील खराब हवा गुणवत्ताही मिळते. ज्वालामुखीच्या परिसरात सल्फर डाय ऑक्साइडचे मोठे प्रमाण तेथे असते. ज्वालामुखी विस्फोटामुळे हा वायू तेथील परिसरात मोठ्या प्रमाणात असतो. तरीही लोक तेथे येऊन पिझ्झा खात असतात.
ज्वालामुखीच्या काठावर बसून पिझ्झा खाणे ग्वाटेमाला पर्यटनाचा महत्त्वाचा हिस्सा ठरला आहे. लोक याला अॅक्टिव्ह वॉल्केनोदरम्यान बसून येथे पिझ्झा खात असतात. या अॅक्टिव्ह वॉल्केनोचे नाव पकाया असून त्यात मे 2021 मध्ये विस्फोट झाला होता. हा ग्वाटेमालातील तीन जागृत ज्वालामुखींपैकी एक असून तो 2500 मीटर उंच आहे. याच्या एका हिस्स्यावर पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येते, तेथेच पिझ्झा तयार करत खायला दिला जात असतो.