जगातील सर्वात धोकादायक प्रयोगशाळा
जिवंत माणसांमध्ये सोडले जायचे जीवघेणे विषाणू
जगात अशा अनेक प्रयोगशाळा आहेत, ज्यांना अत्यंत धोकादायक मानले जाते. दुसऱ्या महायुद्धादरम्यान अशीच एक प्रयोगशाळा सर्वात धोकादायक म्हणून ओळखली जायची. या प्रयोगशाळेचे नाव ‘युनिट 731’ होते. जपानी सैन्याने या प्रयोगशाळेची स्थापना केली होती, याला इतिहासातील सर्वात भीतीदायक टॉर्चर हाऊस मानले जाते. येथे जिवंत माणसांवर अनेक धोकादायक प्रयोग पेले जायचे. ज्याविषयी कळल्यावर लोक हादरून जात होते. ही प्रयोगशाळा प्रत्यक्षात चीनच्या पिंगफांग जिल्ह्यात होती, परंतु याचे संचालन जपानचे सैन्य करत होते.
‘युनिट 731’ला जपानी सैन्याने जैविक अस्त्र निर्माण करण्यासाठी सुरू केले होते. येथे जिवंत माणसांच्या शरीरात धोकादायक विषाणू आणि रसायने सोडून त्यांच्यावर प्रयोग केले जात होते. माणसांना या भीतीदायक प्रयोगशाळेत अशाप्रकारच्या यातना दिल्या जात होत्या, ज्याविषयी आपण कल्पनाही केलेली नसेल.
युनिट 731 लॅबमध्ये चीन, अमेरिका आणि ब्रिटनसारख्या देशांमधून पडकण्यात आलेल्या लोकांवर प्राण्यांप्रमाणे प्रयोग व्हायचे. यात अनेक लोक तडफडून तडफडून मरून जाते, तर जे जिवंत वाचायचे, त्यांना मारून टाकले जात होते आणि ते अखेर कसे वाचले हे पाहण्यासाठी चिरफाड केली जात होती. अशाप्रकारचे प्रयोग करण्यासाठी 3 हजारांहून अधिक लोकांना ठार करण्यात आले होते, असे सांगण्यात येते.
या लॅबमध्ये फ्रॉस्टबाइट टेस्टिंग नावाच्या एका प्रयोगादरम्यान माणसांचे हातपाय पाण्यात बुडविले जायचे आणि तर ते गोठेपर्यंत पाणी थंड केले जात होते. यानंतर गोठलेल्या हातपायांना गरम पाण्यात वितळविले जायचे, जेणेकरून वेगवेगळ्या तापमानाचा शरीरावर कशाप्रकारे प्रभाव पडतो हे जाणून घेता येईल. या धोकादायक प्रयोगात अनेक लोकांचा जीव देखील जात होता.
माणसांच्या शरीरात प्रथम धोकादायक विषाणू सोडला जायचा आणि त्यानंतर त्याच्या प्रभावित अववयांमध्ये आजार फैलावतो की नाही हे पाहण्यासाठी तो कापला जायचा. या धोकादायक प्रयोगातही अनेक लोक स्वत:चा जीव गमावून बसत, तर ते जिवंत राहत, त्यांच्यावर मग ‘गन फायर टेस्ट’ केली जात होती. जेणेकरून बंदूक मानवी शरीराला किती नुकसान पोहोचवू शकते हे पाहता येईल.
चीनच्या पिंगफांगमध्ये असलेली युनिट 731 धोकादायक प्रयोग करणारी एकमात्र प्रयोगशाळा नव्हती. तर चीनमध्ये याच्या आणखी अनेक शाखा होत्या. ज्यात लिंकोउ (ब्रँच 162), मुडनजियांग (ब्रँच 643), सुनवु (ब्रँच 673) आणि हॅलर (ब्रँच 543) सामील होती. परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर या सर्व प्रयोगशाळांमध्ये धोकादायक प्रयोग करण्याचे काम थांबले आणि या जागा निर्जन ठरल्या. आता तर यातील अनेक ठिकाणी लोक फिरण्यासाठी येत असतात.