महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जगातील सर्वात घातक डिश

06:05 AM Sep 16, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सायनाइडपेक्षा 10 हजार पट अधिक विष

Advertisement

फुगु याला ब्लोफिश देखील म्हटले जाते, ही जगातील सर्वात घातक डिश आहे. हे व्यंजन तयार करण्यासाठी शेफ्सना अनेक वर्षापर्यंत प्रशिक्षण घ्यावे लागते. कारण यात किंचित चूक देखील ही डिश खाणाऱ्यांसाठी जीवघेणी ठरू शकते. फुगु माशाच्या अवयवांमध्ये सायनाइडपेक्षाही 10 हजार पट अधिक घातक विष आढळते. हे विष शेफला डिश तयार करतानाच मोठ्या काळजीपूर्वक काढून टाकावे लागते. फुगु डिश योग्यप्रकारे तयार करण्यात न आल्यास ही एक घातक मेजवानी ठरू शकते. या डिशला जगातील सर्वात घातक व्यंजन म्हणून घोषित करण्यात आले आहे. ही डिश योग्यप्रकारे तयार करण्यासाठी कुकना अनेक वर्षांपर्यंत प्रशिक्षण घ्यावे लागते.

Advertisement

तीन किंवा त्याहून अधिक वर्षांचे प्रशिक्षण असलेल्या कुकनाच ही डिश तयार करण्याची अनुमती असते.  जपानी शेफकडे जपानमध्ये ब्लोफिश तयार करण्यासाठी परवाना लागतो. हा परवाना प्राप्त करणे अत्यंत कठिण असून याकरता अनेक वर्षांचे प्रशिक्षण लागते असे लंडन येथील प्रसिद्ध जपानी रेस्टॉरंटच्या एका सदस्याने सांगितले आहे. फुगु माशामध्ये टेट्रोडोटॉक्सिन विष आढळून येते, हे सायनाइडपेक्षा 10 हजार पट अधिक विषारी मानले जाते. टेट्रोडोटॉक्सिन विष माणसांसाठी अत्यंत घातक आहे. सर्वात प्रथम हे विष संबंधित व्यक्तींच्या पेशींचे कार्य रोखते. यानंतर पीडित व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होतो आणि अखेरचा श्वास गुदमरून त्याचा मृत्यू होतो.  फुगु माशामध्ये विष आढळून येत असल्याने शेफ्सना विषारी भाग यशस्वीपणे हटविणे आणि उर्वरित मांसाला विषारी होण्यापासून वाचविण्यासी विशेष काळजी अन् अचुकतेसोबत काम करावे लागते. ही जोखीम पाहता फुगु माशाच्या डिशवर जपान, कोरियामध्ये अनेक बंधने आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article