For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मिनी सुएज कालव्याची निर्मिती इजिप्त करणार, मोठा खर्च येणार

07:00 AM Oct 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
मिनी सुएज कालव्याची निर्मिती इजिप्त करणार  मोठा खर्च येणार
Advertisement

कैरो : सुएज कालव्याला सागरी वाहतुकीची जीवनरेषा संबोधिले जाते. जगातील एकूण सागरी वाहतुकीचा एक चतुर्थांश हिस्सा सुएज कालव्याच्या माध्यमातूनच होते.  सुएज कालव्याचा मालक असलेला देश इजिप्त आता नव्या कालव्याची निर्मिती करणार आहे. याला मिनी सुएज कालवा म्हटले जाणार आहे. हा कालवा केवळ 54 किलोमीटर लांबीचा असेल, परंतु याकरता 1.5 अब्ज पाउंड इतका मोठा खर्च येणार आहे. इजिप्त मिनी सुएज कालव्याची निमिर्ती स्वत:च्या लोकसंख्यात्मक आव्हानांवर तोडगा काढण्यासाठी करत आहे. या कालव्याद्वारे इजिप्तच्या वाळवंटी भूमीला वास्तव्ययोग्य क्षेत्रांच्या स्वरुपात विकसित केले जाणार आहे.

Advertisement

इजिप्तची केवळ 4 टक्के भूमीच वास्तव्ययोग्य मानली जाते. इतक्या कमी भूभागात 11.35 कोटी लोक राहतात. अशा स्थितीत या लोकांसाठी सुविधा उपलब्ध करविणे इजिप्तसाठी आव्हानात्मक ठरत आहे. इजिप्तचा 90 टक्क्यांहून अधिक हिस्सा वाळवंटी आहे. इजिप्तच्या ‘मिनी सुएज कालव्या’च्या नावाने प्रसिद्ध या प्रकल्पाच्या निर्मितीमुळे भूमध्य समुद्रातील पाणी वाळवंटात आणले जाणार आहे. इंजिनियरिंगच्या या चमत्कारामुळे कतरा डिप्रेशनमध्ये पूर येणार असून यातून 20 हजार चौरस किलोमीटरचे सरोवर निर्माण होणार आहे. या परिवर्तनाचे परिणाम अत्यंत गंभीर होण्याचा अनुमान आहे. नव्या सरोवराच्या पाण्याच्या बाष्पीभवानमुळे आसपासच्या भागांमध्ये आर्द्रतेची पातळी आणि पावसात उल्लेखनीय वृद्धी होण्याची अपेक्षा आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.