For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सर्वात धोकादायक बीच

06:43 AM Jul 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
सर्वात धोकादायक बीच
Advertisement

मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांच्या संख्येचा होतोय विक्रम

Advertisement

समुद्राच्या मध्ये धोका असतो हे मान्य. परंतु समुद्रकिनाऱ्यावरही धोका असू शकतो का? कुठल्याही बीचला सर्वात धोकादायक बीच म्हणून ठरविले जाऊ शकते का? अमेरिकेत एक बीच तेथील सर्वात धोकादायक किंवा सर्वात घातक म्हणून ओळखले जाते, या सुंदर ठिकाणी मोठ्या संख्येत लोक मरत असल्याने ही ओळख प्राप्त झाली आहे. तेथे नैसर्गिक धोके आहेत, तरीही लोक येथे येणे सोडत नाहीत, ज्यामुळे त्यांची सुरक्षा चिंतेचे कारण ठरत आहे.

सेंट्रल फ्लोरिडाच्या पूर्व किनाऱ्यावर असलेल्या या लोकप्रिय किनाऱ्याचे सौंदर्य आणि वाळवंटानंतरही याच्या किनाऱ्यावर तसेच समुद्रात अनेक कारणांमुळे लोकांचे मृत्यू झाला आहे. न्यू स्मिर्ना बीचवर वादळांपासुन शार्कचे हल्ले, लोकांच्या सर्फिंगमध्ये अडथळ्यांचा सामना इत्यादींमुळे लोकांचा उच्चांकी संख्येत मृत्यू झाला आहे.

Advertisement

हे सर्वात घातक बीचच्या यादीत फ्लोरिडायच 9 अन्य समुद्र किनाऱ्यांपेक्षा वरच्या स्थानी आहे. आता याला सर्वात अप्रिय बीच म्हणून ओळखले जाते आहे. चालू महिन्याच्या प्रारंभी न्यू स्मिर्नामध्ये अधिकाऱ्यांनी या समुद्रकिनाऱ्यावर जवळपास 400 जणांना वाचविण्याचा विक्रम नोंदविला आहे. जगाची शार्क बाइट कॅपिटल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या समुद्रकिनाऱ्यावर 3 जुलैपासून तीन हल्ले झाले आहेत. परंतु सिमरिन लॉनुसार येथे एकूण 185 शार्क हल्ले नोंदविले गेले आहेत. तरीही समुद्र किनाऱ्याचे सर्वात मोठे नुकसान याच्या वादळांमुळे होते. 10 सर्वात धोकादायक समुद्रकिनाऱ्यांमध्ये फ्लोरिडा असण्याचे कारण शार्कहल्ले असल्याचे वकील मायकल सिमरिन यांनी म्हटले आहे.

फ्लोरिडाच्या समुद्रकिनाऱ्यावर नेहमीच वादळाची जोखीम आहे. वादळामुळे येथे धोकादायक लाटा निर्माण होतात, यामुळे समुद्रकिनाऱ्यावर जाणाऱ्यांसाठी जोखीम अधिकच वाढते.

Advertisement
Tags :

.